
फोटो सौजन्य सोशल मिडिया
रात्री घरा बाहेर खेळत असताना बिबट्याने हा प्राण घातक हल्ला केला आहे. गावातल्या लोकांनी या बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण ऊसाच्या शेतात या मुलाचा मृतदेह सापडला ; त्याला हॅासपिटल मध्ये दाखल केल्यानंतर डाॅक्टरांनी या मुलाला मृत घोषीत केले. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याच बरोबर वनविभाग आणि महावितरणविरोधात ग्रामस्थांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी न्हाळेवाडीत दाखल झाले. उसाची शेत आणि ओढ्यांच्या परिसरात बिबट्याचा माग काढण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून वनविभागाने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याचे आणि एकट्याने शेतात न जाण्याचे आवाहन केले आहे.
03 ऑक्टोबर 2026 शनिवारी संध्याकाळी न्हाळेवाडी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. संपूर्ण गावात अंधार पसरलेला असल्यामुळे आधीपासूनच दबा धरून बसलेल्या बिबट्याने घराच्या अंगणातून किंवा दरवाजातून बाहेर येत असलेल्या या दोन वर्षांच्या चिमुकल्या हल्ला केला ; आणि उसाच्या शेतात फरफटत घेऊन गेला. बिबट्याने या मुलाला घराशेजारील उसाच्या शेतात नेले, हे ऊसाचे शेत जवळ जवळ 500 मिटर इवढ्या अंतरापर्यंत आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी गावातील तरुणांनी टॉर्चच्या साहाय्याने शोधघेण्याचा प्रयत्न केला; एका ओढ्याजवळ बिबट्या बालकाला घेऊन बसलेला दिसला. गावातील तरुणांनी आरडाओरडा केला. आणि गोंधळ घालून बिबट्याला पळवून लावण्यात आले. बिबट्याच्या या हल्यात जय खंडागळे या मुलगा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात घेऊन गेल्या नंतर डॅाक्टरांनी या मुलास मृत घोषित केले.
न्हाळेवाडी गावात गेल्या ३ महिन्यांपासून या बिबट्याचा वावर होत होता. वारंवार मागणी आणि तक्रार करून देखिल वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी कोणतीच पावले उचलली नाहीत. असा आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे. जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत या मुलाचे पार्थिव ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
सुरक्षेचा उपाय म्हणून वनविभागाने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याचे आणि एकट्याने शेतात न जाण्याचे आवाहन केले आहे.
ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अचानक वीज खंडित होते, या मुळे वन्य प्रण्याचा वावर गावामध्ये होत असतो. वनविभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे. नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा गावातील लोकांनी दिला आहे.