Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी कधी मुलगी अन् पुतण्या भेदभाव केला नाही, सत्ताधारी पदे तर….’ शरद पवार यांचे आरोपांवर स्पष्टीकरण

सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही. सत्तेची पदे नेहमी अजित पवार यांना दिली असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 19, 2024 | 03:32 PM
‘मी कधी मुलगी अन् पुतण्या भेदभाव केला नाही, सत्ताधारी पदे तर….’ शरद पवार यांचे आरोपांवर स्पष्टीकरण
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड पुकारत भाजपसोबत युती केली. यानंतर शरद पवार यांच्याकडून भेदभाव होत असून आपण त्यांचा मुलगा नाही म्हणून आपल्या पक्ष दिला नाही असा आरोप अजित पवार करत आले आहेत. त्यामुळे अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यामध्ये शरद पवार हे मतभेद करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर आता एका मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही. सत्तेची पदे नेहमी अजित पवार यांना दिली असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

अजित पवार यांच्याबाबत भेदभाव करत असलेल्या आरोपांवर शरद पवार म्हणाले, मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याबाबत कधीही मुलगी-पुतण्या असा भेद केला नाही. सुप्रिया सुळे आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आले नाही. याउलट अजित पवार यांना कायमच सत्तापदे देण्यात आली. अजित पवार यांना राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीनवेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्वकाही देण्यात आले. सुप्रिया सुळे यांना फक्त खासदारकी दिली असून त्या दिल्लीच्या राजकारणात आहेत. सुप्रिया यांना कधीही सत्तापद देण्यात आले नाही, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले आणि अजित पवार यांच्या आरोपांचे खंडन केले.

पाहिजे तर तुम्ही जा, मी येणार नाही

भाजपसोबत युती करण्यामागे विकासकामे हे कारण अजित पवार गटाकडून सांगण्यात येते. शरद पवार यांनी यावर देखील प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले, “सत्तेत असल्याशिवाय जनतेची कामे करता येत नाहीत, दाव्यात तथ्य नाही. विरोधी पक्षनेत्याचे पद आणि विरोधी पक्षही लोकशाहीत कायम महत्त्वाचा असतो. माझ्या 56 वर्षांच्या कारकीर्दीत मी केवळ 20 वर्षे सत्तेत होतो. उर्वरित काळ मी विरोध पक्षात घालवला. एस.एम. जोशी, कृष्णराव धुळप, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या नेत्यांनी विरोधी पक्षात राहून आपले स्थान निर्माण केले. बॅरिस्टर पै नाथ बोलायला उभे राहिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुही थांबून त्यांचे भाषण ऐकायचे. परंतु, राष्ट्रवादीचे काही नेते सत्तेविना राहू शकत नव्हते. त्यांनी पाच वर्षे विरोधात काढली होती. या मंडळींना भाजपसोबत जाण्याची घाई झाली होती. पण मी त्यांना सांगितले होते की, पाहिजे तर तुम्ही जा, मी येणार नाही.” असे उत्तर शरद पवार यांनी दिले.

Web Title: I never discriminate between sharad pawar and ajit pawar says sharad pawar gives explain political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2024 | 03:32 PM

Topics:  

  • ajit pawar
  • DCM Devendra Fadnavis
  • Loksabha Elections
  • Nationalist Congress Party
  • political news
  • supriya sule

संबंधित बातम्या

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात
1

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’
2

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
3

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण
4

Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.