Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झाडे वाचली तर आपणही वाचू, हाच महाराष्ट्र दिनाचा संदेश : सयाजी शिंदे

शेवटी झाडे वाचली तर आपणही वाचणार आहोत, हाच माझा महाराष्ट्र दिनाचा संदेश आहे, असे सयाजी शिंदे यांनी सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 30, 2022 | 04:46 PM
झाडे वाचली तर आपणही वाचू, हाच महाराष्ट्र दिनाचा संदेश : सयाजी शिंदे
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गंगाखेड-परळी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी गंगाखेड शहरात वडाची झाडे तोडली जात होती. पण शूटिंगच्या निमित्ताने गंगाखेडमध्ये आलेल्या सिनेकलावंत सयाजी शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी ७० वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या या दोन्ही वडांचे पालकत्व स्वीकारले. त्यांना जीवदान देण्यासाठी त्यांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.

यासंबंधीची प्रक्रिया सुरू केली असून गुरुवारपासून जेसीबीने वृक्षांच्या आजूबाजूला मोठे खोदकाम करण्यात येत असून महिन्याभरात शास्त्रीय रित्या पुनर्रोपण करण्यात येईल.

सह्याद्री देवराई ‘ संस्थेच्या माध्यमातून महिनाभरात दोन्ही वड काढून त्यांचे महामार्गापासून काही अंतरावर पुनर्रोपण केले जाईल. सध्या त्या झाडांच्या फांद्या कापून वजन कमी करण्यात आले असून त्यांच्या मुळांना औषध टाकले गेले आहे. वृक्षांच्या पुनर्रोपणाची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी सुरू झाली. सयाजी शिंदे गंगाखेडमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेलशेजारी मशीनच्या साहाय्याने वृक्ष कापले जात असल्याचे भल्या पहाटे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी धावत येऊन संबंधित लोकांना अडवण्याचा प्रयत्न करेपर्यंत वडाचे एक झाड खाली कोसळले होता. त्यांनी तत्काळ बांधकाम विभागाकडे विचारणा केली तेव्हा गंगाखेड-परळी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी लातूरच्या एका कंपनीला कंत्राट देऊन ३२० झाडे तोडली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर शिंदे यांनी सह्याद्री देवराई ‘ या त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून दोन वृक्ष वाचवण्याचा निर्णय घेतला. महिन्याभरात त्यांचे पुनर्रोपण केले जाईल.

परभणीतही धावले सयाजी शिंदे !

परभणी जिल्ह्यात वाटूर-चारठाणा रस्ता कामासाठी रस्त्यालगत असलेली झाडे तोडली जात असल्याची माहिती मिळताच वृक्षप्रेमी तथा प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी गुरुवारी चारठाणा परिसरात धाव घेत ती झाडे वाचविण्यासाठी पुढाकार घेतला.

वाटूर फाटा ते चारठाणा या २७ कि.मी. सिमेंट रस्ता कामासाठी रस्त्यालगतची जवळपास ५० वर्षापासूनची झाडे तोडण्याची मोहीम संबंधित कामाच्या कंत्राटदाराने हाती घेतली होती. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या जिंतूर येथील जागरुक नागरिक मंच, झाड फाऊंडेशन व चारठाणा येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या ग्रुपच्या सदस्यांनी बुधवारी या झाडांना वाचविण्यासाठी मानवी साखळी तयार केली होती. स्थानिक वृक्षप्रेमींची ही धडपड कानावर पडल्यानंतर वृक्षप्रेमी तथा अभिनेते सयाजी शिंदे यांनी धाव घेऊन पुनर्रोपणाची पावले उचलली.

[read_also content=”समाजात दंगे होऊ देणार नाही हा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार : रेखा ठाकूर https://www.navarashtra.com/maharashtra/deprived-bahujan-aghadi-decides-not-to-allow-riots-in-society-rekha-thakur-nrdm-274676.html”]

झाडे वाचली तर आपणही वाचू, हाच महाराष्ट्र दिनाचा संदेश

झाड आहे तर वाढ आहे. कार्बन डाय ऑक्साईड घेऊन माणसाला ऑक्सीजन देण्याची, अन्न देण्याची किमया फक्त झाडांकडे आहे. म्हणून झाडे सर्वश्रेष्ठ आहेत. मे महिन्यात झाडांचे महत्व आपल्याला कळते.रस्ता रुंदीकरणात जाणारे वृक्ष वाचवायला हवेत. वडाची दोन झाडे वाचवण्यासाठी प्रशासनाशी बोलणे झाले आहे. प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सींग द्वारे चर्चा केली जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवणे शक्य होणार आहे. शेवटी झाडे वाचली तर आपणही वाचणार आहोत, हाच माझा महाराष्ट्र दिनाचा संदेश आहे, असे सयाजी शिंदे यांनी सांगितले.

Web Title: If trees survive so do we this is the message of maharashtra day sayaji shinde nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2022 | 04:46 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • Marathwada
  • pune news
  • Sayaji Shinde

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक
1

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
2

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी
3

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
4

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.