मुंबई : आयआयटी बॉम्बेच्या (IIT Bombay) विद्यार्थ्यांनी यावेळी कमाल केली आहे. दरवर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून विद्यार्थ्यासांठी जॅाब प्लेसमेंट आयोजीत केला जातो. यामध्ये देशविदेशातील विविध कंपण्यांकडून विद्यार्थ्यांना जॅाब ऑफर दिले जातात. यावर्षी या विद्यार्थ्यांनी विक्रमच रचला आहे. आयआयटी बॉम्बेच्याच्या एक-दोन नाहीत तर तब्बल 85 विद्यार्थ्यांना एक कोटींहून अधिक पगाराच्या पॅकेजसह नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत. एवढचं नाही तर 20 डिसेंबरपर्यंत संस्थेमध्ये 1,340 ऑफर देण्यात आल्या होत्या, ज्याद्वारे आतापर्यंत 1,188 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
[read_also content=”‘द फॅमिली मॅन’ नंतर मनोज बायपेयीची पुन्हा वेबसिरीजमध्ये पुन्हा दमदार भूमिका, ‘किलर सूप’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! https://www.navarashtra.com/movies/killer-soup-webseries-trailer-released-manoj-bajpayee-and-konkan-sen-sharma-sharing-screen-together-nrps-494688.html”]
यावर्षी, 2,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 60% विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत. दुसरा टप्पा या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. यावेळी रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्पेसला सर्वाधिक पगार मिळाला असून, यंदा येथील सरासरी वार्षिक पगार ३६.९ लाख रुपये आहे, जो गेल्या वर्षी केवळ ३२.२५ लाख रुपये होता.
यावर्षी जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड, सिंगापूर आणि हाँगकाँगसह एकूण 63 आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी नोकऱ्या देऊ केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनीने दिलेला कमाल पगार 29 लाख हाँगकाँग डॉलर (सुमारे 3 कोटी रुपये) आहे. या प्लेसमेंटचा एकूण सरासरी पगार वार्षिक 24.02 लाख रुपये आहे. इंजिनीअरिंगसाठी सरासरी पॅकेज 21.88 लाख रुपये, आयटी आणि सॉफ्टवेअरसाठी 26.35 लाख रुपये, फायनान्ससाठी 32.38 लाख रुपये, संशोधन आणि विकासासाठी सरासरी वेतन 36.94 लाख रुपये होते. 1 ते 15 डिसेंबर दरम्यान पहिल्या टप्प्यात 388 लोकांना नियुक्त करण्यात आले होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी 1,340 ऑफर दिल्या.
यापूर्वी आयआयटी बॉम्बेच्या 2022-23 बॅचच्या पदवीधराला एका परदेशी कंपनीकडून 3.67 कोटी रुपये वार्षिक पगाराची नोकरीची ऑफर मिळाली होती. ही आतापर्यंतची सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोकरी ऑफर असल्याचे संस्थेने म्हटले आहे. याशिवाय आणखी एका पदवीधराला एका भारतीय कंपनीकडून 1 कोटी रुपयांची नोकरीची ऑफर मिळाली आहे. देशात होणाऱ्या प्लेसमेंटमध्ये हे सर्वाधिक आहे.