Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप

माथेरान आणि कर्जत वन विभागाकडून जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप होत असून, संबंधित ठेकेदारावर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 13, 2026 | 03:49 PM
वन विभागाचे जिओ-टॅग्ड अ‍ॅप ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षण; एका क्लिकवर 45 पर्यावरणपूरक पर्यटनस्थळे

वन विभागाचे जिओ-टॅग्ड अ‍ॅप ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षण; एका क्लिकवर 45 पर्यावरणपूरक पर्यटनस्थळे

Follow Us
Follow Us:

Matheran News Marathi : माथेरान डोंगरात असलेल्या गार्बेटवाडी येथील रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने वन जमीनीत अनधिकृतपणे खड्डे खोदले आहेत.वन विभाग याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नसल्याने संबंधित रस्त्याचे काम करणारा ठेकेदार याविषयी घेत असलेली भूमिका संशयास्पद वाटत आहे.वन जमिनीमध्ये खोदलेले खड्डे याबाबत माथेरान आणि कर्जत वन विभाग यांच्याकडून टोलवाटोलवी करीत असल्याने वन विभागाचे नक्की चाललले आहे तरी काय?असा प्रश्न आदिवासी भागातील लोक करीत आहेत.

माथेरान डोंगरात असलेल्या गार्बेटवाडी या ठिकाणी असलेल्या आदिवासी धनगर लोकांसाठी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला होता.ही आदिवासी वाडी खालापूर तालुक्यात आहे पण या वाडी मध्ये जाण्यासाठी असलेला रस्ता कर्जत तालुक्यातून जात आहे.मात्र हा रस्ता वन जमिनीतून जात असल्याने वन जमिनीतून रस्ता करण्याची परवानगी घेण्यात आल्यानंतर गतवर्षी रस्त्याचे काम सुरू झाले. त्यानंतर यावर्षी त्या भागातील अर्धवट असलेल्या रस्त्याचे काम केले जात आहे.गतवर्षी रस्त्यासाठी तोडण्यात आलेली झाडे यामुळे सर्वत्र गोंगाट झाला होता.त्यानंतर वन विभागाने ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नव्हती.

“आम्ही काय करायचं आणि काय नाही तुम्ही आम्हाला शिकवू नका,” राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांमध्ये वाद

आता त्याच रस्त्याच्या ठेकेदाराने रस्त्याचे काम करण्यासाठी गार्बेटवाडी येथील रस्त्यावर जंगलात अनेक ठिकाणी खड्डे खोदले आहे. माथेरान मधील जंगल हे संरक्षित आणि इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून नोंदणीकृत आहे.त्या जंगलात खोदकाम आणि ब्लास्टिंग करण्यास बंदी आहे.असे असताना देखील जंगलात खोदकाम करण्यात आले असं त्या खड्ड्यात पाणी साठवून ठेवले आहे. याबाबत माथेरान येथे वन अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता गार्बेटवाडी कडे जाणारा रस्त्याखालील जमीन ही कर्जत पश्चिम वन विभागाच्या अखत्यारीत असल्याचे माहिती दिली.तर कर्जत वन विभाग यांना याबाबत विचारले असता कर्जत येथील वन अधिकारी यांनी गार्बेटवाडी ही आदिवासी धनगर लोकांची वस्ती असलेली वाडी खालापूर तालुक्यातील असल्याचे उत्तर दिले.त्यानंतर स्थानिक पातळीवर माहिती घेतली असता ही धनगर वाडी खालापूर तालुक्यातील असून त्या ठिकाणी जाणारा रस्ता कर्जत पश्चिम वन क्षेत्र यांच्या अखत्यारीत आहे.

कर्जत पश्चिम वन अधिकारी हे खालापूर तालुक्यातील काही भागाचे वन अधिकारी आहेत.त्यात गार्बेट वाडी ज्या वावरले वनपाल क्षेत्रातील क्षेत्र आहे तो भाग कर्जत पश्चिम वनक्षेत्रपाल यांच्या हद्दीत आहे.त्यामुळे गार्बेटवाडी कडे जाणारा रस्ता आणि गार्बेटवाडी येथील जमीन कर्जत पश्चिम वन विभागाच्या क्षेत्रात समाविष्ट आहे.त्यामुळे त्या वन जमिनीमध्ये खोदण्यात आलेले खड्डे कर्जत पश्चिम क्षेत्रात आहेत.मात्र संरक्षित वन क्षेत्रातील जमिनीमध्ये खड्डे खोदण्यात आलेले आहेत. त्याबाबत कर्जत पश्चिम वन विभाग यांनी कोणत्याही प्रकारचे गुन्हे काम अद्याप केले नाही.त्याचवेळी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने खड्डे कोणत्या आणि कोणाच्या परवानगीने खोदले याचे कोणतेही उत्तर वन विभागाकडून देण्यात येत नाही.

त्याचवेळी गार्बेट वाडी कडे जाणारा रस्ता हा ज्या नेरळ माथेरान घाट रस्त्याने पुढे जातो.त्या ठिकाणी असलेली वन जमीन ही माथेरान वन विभागाची आहे की कर्जत पश्चिम वन विभागाची आहे याबद्दल कोणत्याही प्रकारे ठोस माहिती वन विभागाकडून दिली जात नाही.तसेच जंगलात खड्डे खोदणारे यांच्यावर देखील कोणतीही कारवाई केली जात नसल्याने वन विभागाच्या या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे.

CBSE 12th Topper: इंग्रजी आणि राज्यशास्त्रात १०० पैकी १००! सीबीएसई टॉपर सुरभी मित्तलची ही मार्कशीट पाहिलीत का?

Web Title: Illegal digging in matheran forest for garbetwadi road work questions raised on forest department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Forest Department
  • maharashtra
  • matheran news

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.