Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: ये रे ये रे पावसा! हवामानाचा लहरीपणा संपेननाच; ‘या’ जिल्ह्यांना…

पुणे शहर, जिल्ह्याचा घाटमाथा परिसर तसेच नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2026 | 07:53 PM
Maharashtra Rain Alert: ये रे ये रे पावसा! हवामानाचा लहरीपणा संपेननाच; ‘या’ जिल्ह्यांना…
Follow Us
Follow Us:

राज्यात मान्सूनच्या प्रगतीला अद्याप गती नाही
अनेक भागांत उष्णतेची लाट, उष्ण व दमट हवामान
रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता

पुणे: राज्यात मान्सूनच्या प्रगतीला अद्याप गती मिळालेली नसतानाच अनेक भागांत उष्णतेची लाट, उष्ण व दमट हवामान तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी (ता. १८) राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची उत्तरी सीमा बुधवारी (ता. १७) कायम होती. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत दुपारी किंवा संध्याकाळनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत उष्णतेची लाट जाणवण्याबरोबरच दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

पुणे शहर, जिल्ह्याचा घाटमाथा परिसर तसेच नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहून संध्याकाळनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert: ढग दाटूनी आले पण…; यंदा पाऊस रूसला? मान्सूनची प्रतीक्षा कायम

दरम्यान, पुणे शहरात बुधवारी (ता. १७) दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. शहराचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गुरुवारी (ता.१८) तापमानात फारसा बदल अपेक्षित नसून कमाल तापमान ३६ अंश आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, मात्र दुपारी अथवा संध्याकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मान्सूनची प्रतीक्षा कायम

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाच्या सरी पडू शकतात. १६ ते १८ जूनदरम्यान वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच १८ व १९ जून रोजी धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यांमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांना पावसाची अद्याप प्रतीक्षाच; कमी पावसामुळे चिंतेचे ढग कायम

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा संध्याकाळी वातावरण अंशतः ढगाळ होऊ शकते. मंगळवारी (ता.१६) शहरातील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बुधवारी (ता.१७) तापमानात आणखी किंचित वाढ होऊन कमाल तापमान ३७ अंश आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Web Title: Imd gave heat wave and rain alert to maharashtra districts weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • Entertainment News
  • IMD alert of maharashtra
  • Weather Update

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
2

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
3

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?
4

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.