Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas : युद्धाचा सातारकरांना बसला फटका; एजन्सीबाहेर ग्राहकांच्या गॅससाठी भल्यामोठ्या रांगा

Middle East war impact on India : आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाची झळ भारतामध्ये बसली आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून साताऱ्यामध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 13, 2026 | 10:53 AM
Impact of the Iran-Israel Conflict Long Queues of Customers Outside Gas Agencies in Satara

Impact of the Iran-Israel Conflict Long Queues of Customers Outside Gas Agencies in Satara

Follow Us
Follow Us:
  • आखाती देशातील युद्धाचा भारतावर परिणाम
  • युद्धामुळे भारतामध्ये इंधन आणि तेल कमतरता
  • साताऱ्यामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा
Satara Gas Shortage : म्हसवड : महेश कांबळे : मध्य पूर्व आखाती देशात सुरु असलेल्या युध्दाची (Iran-Israel War) झळ भारातातील मोठ्या शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेलाही आता बसू लागल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे, युध्दाचे सर्वाधिक परिणाम हा गँसच्या उपलब्धीवर झाला आहे. घरगुती वापरासाठी मिळणारा एल.पी. जी. गॅस (LPG Gas) पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

युध्दाची झळ जगभरातील सर्वच देशांना बसू लागली असून भारातालाही याचा फटका बसत आहे. देशातुन आखाती देशात जाणारा शेतमाल, व फळे ही बंदरावरच अडकून पडली असल्याने देशातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अशातच आता एलपीजी गँस वितरणावर या युध्दाचा गंभीर परिणाम झालेला पहावयास मिळत आहे, मोठ मोठ्या हॉटेल, इंटस्ट्रीजमध्ये वापरल्या जाणाऱ्या एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत, तर अनेकांनी आपल्या हॉटेल बाहेर आता चुलीवरचे जेवण मिळेल असे फलक लावण्यात सुरुवात केली आहे. याचा परिणाम हा आज ना उद्या घरगुती गँस सिलेंडरवरही होईल अशी भीती सामान्य गॅस ग्राहकांना वाटु लागल्याने गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सर्व एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

हे देखील वाचा : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा: मंत्रिमंडळानंतर आता विधानसभेची मोहोर? जाणून घ्या काय आहेत तरतुदी

म्हसवड शहरात असलेल्या शुभम भारत गँस एजन्सीबाहेर ही ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र असले. तरी अद्याप याठिकाणाहून एकाही गॅस ग्राहकाला सिलेंडर मिळाला नाही असे घडले नसल्याने गॅस ग्राहकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एजन्सी मार्फत घरपोच सिलेंडर वितरण सध्या थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये गैर प्रकार होऊ नये यासाठी हा निर्णय एजन्सी चालकांनी घेतला असल्याचे समजते. मात्र ज्याप्रमाणे व्यावसायिक गॅस सिलेंडरची विक्री बंद झाली आहे त्याप्रमाणेच घरगुती गॅस सिलेंडर ही बंद होईल अशी भीती सर्वसामान्य गॅस ग्राहकांना वाटु लागल्याने गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी हे ग्राहक एजन्सीबाहेर गर्दी करु लागल्याचे दिसुन येते. अशातच गँस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी गॅस वितरणात काही अटी घातल्याने सामान्य ग्राहकांचा अधिकच गोंधळ उडाला आहे.

हे देखील वाचा : “नमो नमो अन् जय श्रीराम म्हणा, गॅस आपल्या दारात; LPG गॅस तुटवड्यावरुन विरोधकांची बोचरी टीका

पूर्वी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना २१ दिवसांची अट होती ती आता शहरी भागासाठी २६ दिवसांची तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ४५ दिवसांची केली आहे, तर प्रत्येक ग्राहकांची KYC ही कंपनी ने बंधन कारक केली आहे, ज्यांची नसेल त्यांचे बुकींगच होत नसल्याचे समोर येत आहे. तर प्रत्येक गॅस ग्राहकाला वर्षातुन १२ सिलेंडर दिले जातात त्याप्रमाणे ज्यांचे १२ झाले आहेत त्यांचेपण बुकिंग होत नसल्याचे दिसुन येते, मात्र गॅस ग्राहकाला याची संपूर्ण माहिती नसल्याने त्यांच्या गोंधळात अधिकच भर पडत आहे. ग्राहकांचा हा गोंधळ कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीला योग्य त्या सुचना दिल्या आहेत, त्यानुसार जिल्हाधिकार्यांच्या सुचनानुसारच गॅस ग्राहकाला गॅसचा पुरवठा सुरु असल्याचे येथील एजन्सीच्या सुत्रांकडुन सांगितले जात आहे.

Web Title: Impact of the iran israel conflict long queues of customers outside gas agencies in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Iran-Israel War
  • LPG Gas
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
2

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
3

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!
4

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.