Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कैद्यांच्या दैनंदिन वेतनात वाढ; राज्यातील साडे सहा हजार कैद्यांना होणार वेतन वाढीचा फायदा

राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगणारे कुशल तसेच अकुशल कैद्यांच्या (बंदी) वेतनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, विविध उद्योगांत काम करणाऱ्या कैद्यांना वेतनवाढ देण्यात येणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 21, 2023 | 12:39 PM
कैद्यांच्या दैनंदिन वेतनात वाढ; राज्यातील साडे सहा हजार कैद्यांना होणार वेतन वाढीचा फायदा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगणारे कुशल तसेच अकुशल कैद्यांच्या (बंदी) वेतनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, विविध उद्योगांत काम करणाऱ्या कैद्यांना वेतनवाढ देण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून याबाबत कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते. यंदा शासनाने कैद्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जवळपास साडे सहा हजार कैद्यांना या वेतवनवाढीचा फायदा होणार आहे.

राज्यात छोटी-मोठी एकूण (मध्यवर्ती व ओपन) ४८ कारागृह आहेत. यात शिक्षाधीन (शिक्षा सुनावलेले) व अंडरट्रायल (न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या केसेसमधील न्यायालयीन बंदी) बंदीवान आहेत. त्यांची संख्या ही ४३ हजारांच्या जवळपास आहे. क्षमतेपेक्षा अधिक संख्या कारागृहांमध्ये आहे. दरम्यान, शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांत सुधारणा व्हावी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम कारागृह विभाग राबवत असतो. कारागृहात विविध उद्योग आहेत. शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्या कैद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे रोजगारविषयक प्रशिक्षण दिले जाते. विविध उद्योगांत काम करणाऱ्या कैद्यांना वेतन दिले जाते.

दरम्यान, या कैद्यांना देण्यात येणाऱ्या वेतनात गेल्या काही वर्षांपासून वाढ झालेली नव्हती. त्यामुळे कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी वेतनवाढ करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून, रविवारपासून (२० ऑगस्ट) वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे.

काम करणाऱ्या कैद्यांना दैनंदिन वेतन दिले जाते. कैदी त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृहातील उपाहारगृहातून याद्वारे खरेदी करतात. दैनंदिन वेतनापोटी मिळणारी रक्कम टपाल खात्याच्या सुविधेतून कुटुंबीयांना देखील पाठविली जाते. काही कैदी दैनंदिन वेतनातून वकिलांचे शुल्क भरतात. कैदी कारागृहातील विविध उद्योगात काम करत असल्याने त्यांच्यात स्वावलंबनाची भावना निर्माण होते.

ही काम चालतात कारागृहात…

राज्यातील काही मोठ्या कारागृहात सुतारकाम, लोहारकाम, चर्मकला, हातमाग, यंत्रमाग, बेकरी, उपहारगृह, गॅरेज, मूर्तीकाम, होजिअरी उत्पादन, चादर, भांडी, दैनंदिन वापरातील वस्तू तयार करण्याचे उद्योग चालविले जातात. तेथे हे कुशल कैदी काम करतात. त्यातून त्यांना रोजगार मिळतो.

[blockquote content=”राज्यातील कारागृहातील विविध उद्योगात दररोज ७ हजार कैदी काम करतात. यात सहा हजार ३०० पुरुष असून, ३०० महिला कैद्यांचा समावेश आहे. राज्य शासनाने कारागृहातील विविध उद्योगांत काम करणाऱ्या दैनंदिन वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील साडे सहा हजार कैद्यांना फायदा होणार आहे.” pic=”” name=”- अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलीस महासंचालक, कारागृह विभाग”]

कारागृहात शेती

कारागृहातील कैद्यांना लागणाऱ्या फळभाज्या कारागृहातील शेतात पिकवल्या जातात. कृषी विद्यापीठांच्या मार्गदर्शनाने कारागृहात शेती केली जाते. कारागृहासाठी शेती पूरक व्यवसाय असून, येथे शेळी पालन, कुक्कुट पालन, मस्यपालन, गोपालन, मधमाशी पालन, महाबीज उत्पादन, दूग्ध उत्पादन, चंदन लागवड, साग लागवड, गुऱ्हाळ, मशरुम उत्पादन, बायोगॅस प्रकल्प आदी व्यवसाय आहेत. कारागृहात नियमित काम करणाऱ्या कैद्यांना शिक्षेतून माफी मिळते. त्यामुळे कारागृहातून त्यांची लवकर मुक्तता होते. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना कारागृहात उत्पादित होणाऱ्या ६६ वस्तू कारागृहात खरेदी करणे बंधनकारक आहे. कैद्यांना काम उपलब्ध झाल्याने त्यांना नियमित आर्थिक मोबदला मिळतो. कारागृहातील रोजगार निर्मिती वाढवण्याची जबाबदारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Web Title: Increase in daily wages of prisoners six and a half thousand prisoners in the state will benefit from the salary increase nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2023 | 12:39 PM

Topics:  

  • Amitabh Gupta
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune Crime

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.