पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections Result 2024) मतमोजणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतली असून, नंदूरबार या लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. तर सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीत 16 व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 75 हजार 202 अधिकृत मतांनी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी पाहिला मिळत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदेंनी यापूर्वी आघाडी घेतली होती. मात्र, नंतर भाजपचे उदयनराजे भोसले हे आता आघाडीवर दिसत आहेत.
शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर
शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे हे आघाडीवर असून, त्यांनी 27 हजार मतांची आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे. तर शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.