Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत ‘बोर्डिंग’ बदला, तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेच्या नव्या सुधारणा; खऱ्या प्रवाशांना दिला

तत्काळ तिकीट प्रणालीचा गैरवापर आणि तिकिटांचा काळाबाजार ही मोठी समस्या बनली होती. यावर उपाय म्हणून रेल्वेने बॉट्स आणि फसवे सॉफ्टवेअर ओळखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2026 | 01:19 PM
गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत 'बोर्डिंग' बदला, तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेच्या नव्या सुधारणा; खऱ्या प्रवाशांना दिलासा

गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत 'बोर्डिंग' बदला, तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेच्या नव्या सुधारणा; खऱ्या प्रवाशांना दिलासा

Follow Us
Follow Us:

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तिकीट प्रणालीतील गैरवापर रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वाचे निर्णय घेतले असून, लवकरच प्रवाशांना गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत आपले बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा मिळणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी या पाच नव्या सुधारणांना मंजुरी दिली. यामुळे २०२६ मधील रेल्वे सुधारणा उपक्रमांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता तिकीट उपलब्ध व्हावे आणि शेवटच्या क्षणी होणारी सट्टेबाजीची बुकिंग थांबवावी, हा या सुधारणांचा मुख्य उद्देश असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.(फोटो सौजन्य – istock)

Ashok Kharat Case : खरातला आधीच लागली होती अटकेची चाहूल; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत…

तत्काळ तिकीट प्रणालीचा गैरवापर टळणार

तत्काळ तिकीट प्रणालीचा गैरवापर आणि तिकिटांचा काळाबाजार ही मोठी समस्या बनली होती. यावर उपाय म्हणून रेल्वेने बॉट्स आणि फसवे सॉफ्टवेअर ओळखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे. तसेच आधार आधारित ओटीपी पडताळणी सुरू करण्यात आली. डेटा विश्लेषणातून आयआरसीटीसी प्रणालीतील सुमारे ३ कोटी बनावट खाती शोधून काढून ती बंद करण्यात आली असून, त्यामुळे तिकिटांच्या उपलब्धतेत सुधारणा झाल्याचा दावा रेल्वेने केला आहे.

तिकीट रद्द करण्याची सुविधा उपलब्ध

पूर्वी केवळ मूळ स्थानकावरच तिकीट रद्द करण्याची अट होती. ती आता काढून टाकण्यात येणार असून, देशातील कोणत्याही रेल्वे स्थानकावरून तिकीट रद्द करता येणार आहे.ई-तिकिटासाठी टीडीआर (Ticket Deposit Receipt) दाखल करण्याची अटही हटवण्यात आली असून, तिकीट रद्द केल्यानंतर परतावा स्वयंचलितपणे दिला जाणार आहे.

गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत प्रवास वर्ग (क्लास) अपग्रेड करण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी ही सुविधा केवळ आरक्षण चार्ट तयार होण्यापूर्वीच उपलब्ध होती. नवीन नियमानुसार, प्रवासी गाडी मूळ स्थानकावरून सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत डिजिटल पद्धतीने आपले बोर्डिंग स्टेशन बदलू शकतील. त्यामुळे एखादा प्रवासी मूळ स्थानकावर गाडीत चढू शकला नाही तरी त्याची जागा रद्द होणार नाही आणि तो पुढील सोयीच्या स्थानकावरून प्रवास करू शकेल.

Indian Railwayचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गाड्यांना ‘ब्रेक’, तर उत्तर भारतासाठी विशेष गाड्यांचा पूर

प्रवाशाना अधिक नियोजन करता यावे यासाठी तिकीट रद्द करण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. पूर्वी असलेली ४८, १२ आणि ४ तासांची मर्यादा आता अनुक्रमे ७२, २४ आणि ८ तास करण्यात आली आहे. तसेच आरक्षण चार्ट आता गाडी सुटण्याच्या ४ तासांऐवजी ९ ते १८ तास आधी तयार केला जाणार आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना पर्यायी नियोजन करता येणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Indian railways introduces boarding change facility until 30 minutes before departure to prevent ticket misuse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumabi
  • Mumbai Train

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.