Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोड बातमी : राज्यात मुलींच्या जन्म दरांचा टक्का वाढला, वाचा सविस्तर आकडेवारी

कोल्हापूर जिल्ह्यात मुलींच्या जन्म दराच्या टक्केवारीत अल्प प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाची जनजागृती, शासनाचे कठोर धोरण यामुळे मुलींचा जन्म दराचा टक्का आता वाढत चालला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 01, 2025 | 01:28 PM
गोड बातमी : राज्यात मुलींच्या जन्म दरांचा टक्का वाढला, वाचा सविस्तर आकडेवारी

गोड बातमी : राज्यात मुलींच्या जन्म दरांचा टक्का वाढला, वाचा सविस्तर आकडेवारी

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अनधिकृत गर्भपाताच्या घटना वाढल्या असताना वस्त्रनगरीत मात्र मुलींच्या जन्म दराच्या टक्केवारीत अल्प प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्म दराचा टक्का आलीकडे अत्यंत कमी होता. मात्र प्रशासनाची जनजागृती, शासनाचे कठोर धोरण यामुळे मुलींचा जन्म दराचा टक्का आता वाढत चालला आहे. मुलींचा वाढता टक्का हा आशादायी असला तरी मुलांच्या तुलनेत ही टक्केवारी अजूनही वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून आणखी उपाययोजना राबवण्याची गरज आहे.

वंशाला दिवा पाहिजे या मानसिकतेमुळे मुलींच्या जन्माला घरच्यांकडूनच विरोध होत होता. परिणामी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अत्यंत कमी असे विदारक चित्र होते. मात्र घटत्या मुलींची संख्या पालकांसह प्रशासनाची डोकेदुखी बनली होती. मुलींचा जन्म दर वाढावा यासाठी शासन स्तरावरच अनेक प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच कठोर कायदेही करण्यात आले. त्याचा परिणाम कालांतराने मुलींचा टक्का वाढण्यात झाला.

इचलकरंजी ही वस्त्रनगरी बरोबरच कामगारनगरी म्हणून परिचीत आहे. कामगारांची आर्थिक आणि वाढता शैक्षणिक खर्च यामुळे मुली जन्माला येणे त्यांच्यासाठी कठीण समजले जात होते. इच्छा असूनही अनेकवेळा त्यांना जन्म देणे पालकांसाठी शक्य नव्हते. सुशिक्षित आणि आर्थिक सुबत्ता असणाऱ्या कुटुंबांचीही हीच मानसिकता होती. परिणामी स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले होते. मात्र शासनाने स्त्री भ्रूण हत्येविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. प्रसंगी अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला. स्त्री भ्रूण हत्येचे रॅकेटही मोडीत काढले. परिणामी स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण घटले.

जन्म दर वाढला

  • इचलकरंजी शहरात 2018 मध्ये मुलींचा जन्म दर 13.33 टक्क्यांनी घटला होता.
  • 2019 मध्ये हे प्रमाण कमी होऊन 9.74 टक्क्यांवर आले होते.
  • 2021 मध्ये 15.69 इतका टक्का होता. मात्र 2022 नंतर शहरात मुली जन्म दराबाबत आशादायी चित्र निर्माण झाले होते.
  • 2022 मध्ये 523 मुलांच्या मागे 477 मुली
  • 2024 मध्ये 500 मुलांमागे 454 मुली असा जन्मदर होता.

प्रभावी उपाय योजनांची गरज

शासनाकडून मुलींच्या जन्माचे स्वागत केले जाते. शासनाकडून मुलीच्या जन्मानंतर मुलींचे शिक्षण मोफत केले आहे. त्याचाही. सकारात्मक परिणाम भविष्यात मुलींचें जीवनमान वाढवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत असल्याचे दिसून- येत आहे. शासनाने आणखीन प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

कारवाई होणे गरजेचे

इचलकरंजी शहरात यापूर्वी गर्भलिंग निदान चाचणी करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र प्रशासनाने तातडीने कारवाई केली. शहरातील एक हॉस्पिटल सीलही करण्यात आले होते. त्यामुळे अशा घटनांना पायबंद बसण्यास मोठी मदत झाली आहे. मात्र अद्यापही परिसरातील ग्रामीण भागात तसेच कर्नाटक सीमाभागात अशी चाचणी होत असल्याचे बोलले जाते. त्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.

Web Title: Information has come to light that the birth rate of girls has increased in the state nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Girl
  • kolhapur
  • kolhapur news
  • maharashtra
  • Maharashtra Goverment

संबंधित बातम्या

‘ज्ञानाची चिंगारी’ पेटली जोगेश्वरीत – स्वामी विवेकानंद विद्यालयाला मिळाले नवे ग्रंथालय
1

‘ज्ञानाची चिंगारी’ पेटली जोगेश्वरीत – स्वामी विवेकानंद विद्यालयाला मिळाले नवे ग्रंथालय

Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा
2

Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा

Ladki Bahin Yojana : राज्याच्या तिजोरीवर प्रचंड बोजा! लाडक्या बहिणीसाठी प्रत्येक वर्षी तब्बल 43 हजार कोटींचा खर्च
3

Ladki Bahin Yojana : राज्याच्या तिजोरीवर प्रचंड बोजा! लाडक्या बहिणीसाठी प्रत्येक वर्षी तब्बल 43 हजार कोटींचा खर्च

Compressor explosion : कॉम्प्रेसर फुटून दोन कामगार भाजले, रेमी कंपनीतील दुर्घटना
4

Compressor explosion : कॉम्प्रेसर फुटून दोन कामगार भाजले, रेमी कंपनीतील दुर्घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.