Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naresh Mhaske : “भारतीय सैन्याबाबत गैरसमज पसरवणाऱ्या उबाठा खासदारांची चौकशी करा”, नरेश म्हस्के यांची केंद्र सरकारकडे मागणी

Naresh Mhaske on UBT : भारतीय लष्कराच्या कारवाईवर संशय घेणारे संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोन्ही खासदारांच्या तोंडून पाकिस्तानची भाषा बाहेर पडत असून ते पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते बनले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 12, 2025 | 05:02 PM
"भारतीय सैन्याबाबत गैरसमज पसरवणाऱ्या उबाठा खासदारांची चौकशी करा", नरेश म्हस्के यांची केंद्र सरकारकडे मागणी (फोटो सौजन्य-X)

"भारतीय सैन्याबाबत गैरसमज पसरवणाऱ्या उबाठा खासदारांची चौकशी करा", नरेश म्हस्के यांची केंद्र सरकारकडे मागणी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : ‘ऑपरेशन सिंदूर’वर व भारतीय लष्कराच्या पराक्रमाबाबत लोकांमध्ये संशय निर्माण करणारे उबाठा खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईवर संशय घेणारे संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोन्ही खासदारांच्या तोंडून पाकिस्तानची भाषा बाहेर पडत असून ते पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते बनले आहेत, अशी सडकून टीका खासदार म्हस्के यांनी केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई? OBC प्रतिष्ठानने केली ‘ही’ मागणी

अरविंद सावंत यांना टोला

गेले दोन दिवस भारतीय लष्कराच्या कारवाईवर संजय राऊत आणि अरविंद सावंत संशयास्पद परिस्थिती निर्माण करत आहेत. पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भाषा राऊत आणि सावंत यांच्या तोंडून बाहेर पडत आहे. ‘गिरे तो भी टांग उपर’, हे कोणाला उद्देशून आहे, असा सवाल खासदार म्हस्के यांनी अरविंद सावंत यांना केला. भारताच्या हवाई दलाचे वैमानिक दक्ष असून आदेशाची वाट पाहत आहेत. ‘गिरे तो भी टांग उपर’ म्हणणे हा या वैमानिकांचा अपमान नाही का? अरविंद सावंतने या वक्तव्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावे, असा इशारा म्हस्के यांनी दिला. भारतीय लष्कर हे हिंदुस्थानचे लष्कर आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा सोडून पाकिस्तानची भाषा काय बोलताय, अशा शब्दांत खासदार म्हस्के यांनी उबाठा खासदारांवर बोचरी टीका केली.

भारतीय लष्कराबाबत राऊत आणि सावंत यांनी केलेली वक्तव्यांचा प्रत्येक नागरिकाने तीव्र निषेध करायला हवा, असे ते म्हणाले. १९७१ साली भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्यावेळी पाकिस्तानी वर्तमानपत्रात पाकिस्तान जिंकला, पाकिस्तान लष्कर जाहीर करत होते. या वर्तमानपत्राची प्रत खासदार म्हस्के यांनी यावेळी सादर केली. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला होता. आजही पाकिस्तानी वर्तमानपत्रात पाकिस्तान जिंकला अशा बातम्या येत आहेत. मात्र विरोधकांनी १९७१ प्रमाणेच आज सरकारवर विश्वास ठेवायला हवा. तुम्ही पाकिस्तानच्या लष्करावर विश्वास ठेवणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवणार का भारतीय लष्करावर विश्वास ठेवणार असा सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केला. भारतीय सैन्य हे कोणा पक्षाचे नाही तर देशाचे सैन्य आहे. त्यामुळे लष्करावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. लष्कराने फोटोसकट, व्हिडिओ सकट पुरावे दिले तरी तुम्ही त्यांच्याबाबत गैरसमज पसरवतात हा एकप्रकारे लष्कराचा अपमान असून तो देशद्रोह आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले.

आजची राऊत याची वक्तव्ये पाहता त्यांना पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्तेपद किंवा पाकिस्तानातील एखाद्या वृत्तपत्राचे संपादक पद हवे असेल, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला. मुंबईत २००६ मध्ये झालेले लोकल ट्रेनमधील बॉम्बस्फोट आणि २००८ मध्ये झालेला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी राऊत यांना इंदिरा गांधी यांची आठवण का नाही आली, असा सवाल खासदार म्हस्के यांनी केला. त्यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग होते, मात्र कारभार सोनिया गांधी चालवत होत्या. त्यावेळी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक का नाही केला, असा प्रश्न राऊत हे सोनिया गांधी यांना विचारतील का, असे खासदार म्हस्के म्हणाले. भारतीय सैन्याच्या कामगिरीवर संशय निर्माण करणे हे देशद्रोह आहे. राऊत आणि सावंत यांच्या वक्तव्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली.

रावळपिंडी किंवा लाहोरमधून निवडणूक लढवा !

संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी भारतीय लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त केला. लष्कराच्या कामगिरीवर संशय व्यक्त करुन राजकारण करणाऱ्या राऊत आणि सावंतला ही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा महापालिका निवडणूक वाटली का? पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या राऊत आणि सावंत यांना रावळपिंडी किंवा लाहोरमधून खासदारकीची निवडणूक लढवायची आहे का, असा संतप्त सवाल खासदार म्हस्के यांनी यावेळी केला.

Vijay Wadettiwar: विजय वडेट्टीवारांची भाजपवर सडकून टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीची भूमिका भाजपच्या…

Web Title: Investigate the mps who are spreading misconceptions about the indian army demands naresh mhaske from the central government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Naresh Mhaske
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
4

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.