राजापूर तालुक्यात पाचल येथे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होत असल्याचा एक बनाव वनविभागाने केला असल्याचा आरोप आता सर्वसामान्य जनतेतुन होवु लागला आहे. जे चार आरोपी वनविभागाने हा बनाव करुन पकडले त्यांच्याकडे ना मुद्देमाल मिळाला कि नाही काही ठोस हाती सापडले.
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी जो मुख्यसुत्रधार फरार असल्याचे वनविभाग सांगत आहे तो एक रचलेला बनाव असल्याचा संशयही आता जनमानसातुन व्यक्त केला जात आहे.
दिनाक ४ फेब्रूवारी २०२४ रोजी राजापूर तालुक्यातील पाचल – तळवडे येथे वनविभागाने सापळा रचत एक मारुती बलेनो गाडी पकडली होती. मात्र ती गाडी संशयीत आरोपीनी अधिकाऱ्यांच्या अंगावर घालत पळुन जाण्यात यश मिळवल्याचे वनविभागाने प्रसिध्दीस दिलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले होते. त्यातनंतर त्या संशयीताना गगनबावडा येथुन वनविभागाच्या अधिकाऱ्यानी ताब्यात घेतले मात्र व्हेल माशाच्या उलटीचा मुद्देमाल हाती सापडला नाही. त्याच वेळी या प्रकरणातील मुख्य आरोपीही फरार असल्याचे वनविभागाने सुमारे सहा दिवसानी एक प्रेस नोट प्रसिध्द करत स्पष्ट केले.
या संपुर्ण प्रकरणात आता वनविभागाचे अधिकारी जी घटना सांगत आहेत ती त्यानी रचलेला बनाव असल्याचा संशय सर्वसामान्य जनतेतुन व्यक्त केला जात आहे. जर तळवडे सारख्या ठिकाणी संशयीत आरोपी हाती लागले होते तर ते पळुन कसे काय गेले? कि त्याना पळुन जायला सांगितले ? हा मुद्देमाल नक्की कोणी ताब्यात घेतला ? यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा नक्कीच काही तरी हात असल्याचाही संशय आता व्यक्त केला जावु लागला आहे.
वनविभागाचे परीक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी व राजापूर वन विभाग यानी विभागिय वनाधिकारी रत्नागिरी ( चिपळुण ) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाइ केली असली तरी ही कारवाइ म्हणजे फक्त एक फार्स होता असा आरोप तालुकाभरातुन केला जात आहे. एक मुख्य आरोपी फरार असल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगत आहेत त्याचे नाव पत्ता वनविभागाला पुर्णपणे माहिती असल्याची चर्चा आता सर्वत्र दबक्या आवाजात सुरु आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेली मारुती बलेनो ही कार त्याच दिवशी सौंदळ पासुनच रेल्वेस्टेशनच्या दिशेला असलेल्या एका गावात एका घरासमोर बराच वेळ उभी असल्याचीही चर्चा सुरु आहे. मग ती गाडी वनविभागाने खरेच गगनबावडा येथुन कशी काय आणली ? मग मुद्देमला कुठे गेला ? असे प्रश्नही आता उपस्थित केले जात आहेतं