मुंबई : राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत. दरम्यान, सोमवारी नागपूरच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीका करीत त्यांना नागपूरचा कलंक म्हटले. यानंतर आता फडणवीस विरुद्ध ठाकरे वाद चांगलाच उफाळून आला आहे. यावर दोन्हीकडून टिका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजापाच्या आरोपांना उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.
उद्धव ठाकरे शरद पवारांवर नाराज?
दरम्यान, आज मुंबईत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भाजापाच्या टिकेला प्रतिउत्तर दिले. यावेळी त्यांना भाजपा, व राष्ट्रवादीतील भ्रष्ट आमदारांवर टिका केली. यावेळी त्यांनी शरद पवारांचे देखील नाव घेत नाराजीचा सूर आळवला. मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार मिळणार आहे. हा पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते मिळणार आहे. म्हणजे एकिकडे मोदींनी ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार म्हटल्याबरोबर एनसीपीचे काही आमदार सत्तेत सहभागी होतात. तर दुसरीकडे ज्या मोदींवर शरद पवार टिका करतात, त्याच शरद पवारांकडून मोदींना पुरस्कार दिला जाणार आहे. एकाच व्यासपीठावर दोघे बसणार आहेत. यातून कोणता अर्थ काढायचा असा रोख उद्धव ठाकरेंचा होता. यातून उद्धव ठाकरेंची अस्वस्थता दिसून येत होती.
भ्रष्ट नेत्यांनी सत्तेत सहभागी होत, सहीसलामत सुटले
राज्यातील सत्तानाट्यावर विविध प्रतिक्रिया येत असून, जनता संतप्त आहे. पण यातून अनेक अर्थ व त्या अर्थाचे अन्वयार्थ काढले जाताहेत. दरम्यान, राष्ट्रवादीला सरकारमध्ये पाठवण्याची ही खेळी शरद पवारांचीच असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. कारण दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी एनसीपीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आणि लगेच तेच आमदार सरकारमध्ये सहभागी होतात. त्यामुळं नक्की काय समजायचे, वरुन जरी राष्ट्रवादीत फूट असं दिसत असले तरी आमदारांना पाठवण्याचा गेम हा शरद पवारांचाच आहे. त्यामुळं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. ते आमदारा सत्तेत सहभागी असल्यामुळं सहीसलामत सुटले, असा अर्थ राजकीय विश्लेषक काढत आहेत. या कारणावरुन उद्धव ठाकरे अस्वस्थ असून, ते शरद पवारांवर नाराज असल्याचं बोललं जातंय