Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War : इराण-इस्रायल युद्धाचा शेतकऱ्यांना फटका; जळगावमधील केळी उत्पादक शेतकरी चिंतेत

इराण आणि इस्राइल या देशांमधील युद्धाचा मोठा फटका जळगावमधील केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसला आहे. आखाती देशांमधील रमजानमधील निर्यात पूर्णपणे ठप्प पडली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 02, 2026 | 04:55 PM
Jalgaon banana exports suspended due to Iran-Israel war causing losses to farmers and traders

Jalgaon banana exports suspended due to Iran-Israel war causing losses to farmers and traders

Follow Us
Follow Us:
  • रमजानच्या महिन्यामध्ये इराण-इस्रायल युद्धाचा भडका
  • केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका
  • आखाती देशातील निर्यात पूर्णपणे थांबली
Iran Israel War :  जळगाव : इराण आणि इस्रायलमध्ये विनाशकारी युद्ध सुरु आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे इस्रायलने जोरदार हल्ला केला आहे. यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला. यामुळे शिया मुस्लीमांनी शोक व्यक्त केला आहे. ऐन रमजानच्या महिन्यामध्ये सुरु झालेल्या या युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. रमजानच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात केली जाते. मात्र युद्धामुळे जळगावमधील (Jalgaon News) शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगाव जिल्हा हा केळीच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. केळीच्या पदार्थांचे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. त्याचबरोबर परदेशांमध्ये देखील जळगावच्या दर्जेदार केळींची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. रमजान महिन्यामध्ये ही मागणी अधिक वाढते. मात्र रमजान महिन्यामध्येच आखाती देशांमध्ये युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. तसेच सुप्रीम नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या झाल्यामुळे रमजान सणावर शोककळा पसरली आहे. यामुळे मुस्लिम वर्गातील रमजानाचा उत्साह पूर्णपणे निघून गेला आहे. याचा फटका जळगावमधील शेतकऱ्यांना बसला आहे.

हे देखील वाचा : पुण्यातील इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले; भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु

जळगाव जिल्ह्यातून सध्या देखील दररोज सुमारे 12 कंटेनर केळी आखाती देशांकडे पाठवली जात होती. मात्र युद्ध परिस्थितीमुळे ही निर्यात पूर्णपणे ठप्प पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. . एकीकडे केळीची निर्यात ठप्प झाली असून दुसरीकडे केळीच्या दरात देखील मोठी घट झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. युद्धापूर्वी केळीचा दर 2500 रुपये क्विंटल एवढा होता. मात्र, त्यात आता घट झाल्याने केवळ 1500 रुपये क्विंटल एवढाच दर केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची मदत करावी असे आवाहन केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केले जात आहे.

हे देखील वाचा : मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक वळणावर! इराणचा थेट नेतन्याहूंच्या कार्यालयावरच हल्ला, IRGC चा दावा

पुण्यातील विद्यार्थी अडकले दुबईत 

पुण्यातील इंदिरा या नामांकित विद्यालयाचे ८४ लोक दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ८४ जणांमध्ये ८० विद्यार्थी असून ४ शिक्षकांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृपया कोणी ही घाबरून जाऊ नये, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशात आणले जाणार आहे असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच सर्व विद्यार्थी हे सुरक्षित असल्याची खात्री विद्यापीठाने दिली आहे.

कोल्हापूरमधील पर्यटकांची चिंता वाढली 

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे नागरिक विविध ठिकाणी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आखाती देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 150 कोल्हापूरकरांपैकी 130 जणांची अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली आहे. या सर्व नागरिकांशी प्रशासन सातत्याने संपर्कात असून ते सुरक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Jalgaon banana exports suspended due to iran israel war causing losses to farmers and traders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran Israel Conflict
  • jalgoan

संबंधित बातम्या

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
1

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

Khamenei Funeral: 69 वर्षांची प्रतीक्षा… खामेनींचा मृतदेह दफन करण्यापूर्वी का नेला जाणार कर्बला आणि नजफला?
2

Khamenei Funeral: 69 वर्षांची प्रतीक्षा… खामेनींचा मृतदेह दफन करण्यापूर्वी का नेला जाणार कर्बला आणि नजफला?

Khamenei Funeral: इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था, लष्कर सतर्क; मुज्तबा राहणार का उपस्थित?
3

Khamenei Funeral: इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था, लष्कर सतर्क; मुज्तबा राहणार का उपस्थित?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.