Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drought News : शेतात जाऊन केंद्रीय पथकाने पाहिली पिकांची अवस्था; शेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी, शेतकऱ्यांना काय मदत मिळणार?

Drought News : जालना जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने बदनापूर आणि अंबड तालुक्यांतील शेतशिवारांची पाहणी केली. करपलेलं सोयाबीन, मोसंबीची वाळलेली झाडं, कोरड्या विहिरी आणि गल्हाटी मध्यम प्रकल्पातील पाण्याची स्थिती पाहून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

  • By विवेक
Updated On: Oct 09, 2026 | 09:34 PM
Jalna drought inspection

Jalna drought inspection

Follow Us
Follow Us:
  • केंद्रीय पथकाची दुष्काळी भागात पिकांची प्रत्यक्ष पाहणी
  • कोरड्या विहिरी, शेततळे आणि गल्हाटी मध्यम प्रकल्पातील पाण्याची स्थिती पाहिली.
  • नुकसानभरपाई, आर्थिक मदत आणि पाणी उपलब्धतेसाठी उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी
 

Drought News : पावसाअभावी शेतीचं मोठं नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने जालना जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. बदनापूर तालुक्यातील नाणेगाव, अंबड तालुक्यातील किणगाववाडी आणि जामखेड परिसरात जाऊन पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. या पाहणीनंतर पथक शासनाला परिस्थितीचा अहवाल सादर करणार आहे.

कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने विविध शेतांमध्ये जाऊन पिकांचं निरीक्षण केलं. पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम आणि संभाव्य उत्पादनातील घट याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

सोयाबीन, मोसंबी, कापूस आणि बाजरी पिकांचा आढावा

बदनापूर तालुक्यातील नाणेगाव येथे शेतकरी शिवाजी डोंगरे यांच्या शेतातील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. अंबड तालुक्यातील किणगाववाडी येथे उदल हरीचंद शिहिरे यांच्या शेतातील करपलेली मोसंबीची झाडं आणि कोरडं पडलेलं शेततळं पाहण्यात आलं.

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

याशिवाय शिवलाल गांगे यांच्या शेतातील अदरक, बालचंद गांगे यांच्या शेतातील कापूस आणि जामखेड येथील संतोष गुरुके यांच्या शेतातील बाजरी पिकाची पाहणी करण्यात आली. गणेश जुंजार यांच्या शेतातील कोरड्या विहिरीचीही पाहणी करून पाण्याच्या उपलब्धतेबाबत माहिती घेण्यात आली.

गल्हाटी प्रकल्पातील पाणीसाठ्याचीही पाहणी

केंद्रीय पथकाने अंबड तालुक्यातील कोरड्या पडलेल्या गल्हाटी मध्यम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांचा पाणीपुरवठा, सिंचनासाठी कमी झालेलं पाणी आणि मच्छीमारीवर उपजीविका करणाऱ्या १०६ कुटुंबांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.

प्रकल्प परिसरातील उत्तमराव साळुंके यांच्या शेतातील कापूस आणि इतर शेतांमधील ऊस पिकांचीही पाहणी करण्यात आली. पाण्याअभावी शेतीसमोर निर्माण झालेल्या अडचणींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी पथकाला दिली.

शेतकऱ्यांनी मांडल्या नुकसानभरपाईच्या मागण्या

पावसातील खंड, पिकांचं नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि सिंचनासाठी पाणी मिळण्यात येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांनी पथकासमोर मांडल्या. प्रतिकूल हवामानामुळे शेतीचं आर्थिक गणित बिघडत असल्याचं सांगत त्यांनी शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

केंद्रीय पथक शासनाला अहवाल देणार

जिल्ह्यातील पर्जन्यमान, खरीप पिकांची सद्यस्थिती आणि दुष्काळसदृश परिस्थितीबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पथकाला सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष पाहणी आणि शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेच्या आधारे पथक शासनाला अहवाल सादर करणार आहे.

या अहवालानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई किंवा अन्य मदतीबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे लक्ष लागलं आहे. पीक नुकसानीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून आर्थिक मदत द्यावी आणि पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा

Web Title: Drought news jalna drought central team crop damage inspection farmers vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • drought news
  • jalna news
  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

Hungary News : हंगेरीमध्ये १२६ वर्षांतील सर्वाधिक तीव्र दुष्काळ; शेती, पाणीपुरवठा आणि ऊर्जा क्षेत्रावर संकट
1

Hungary News : हंगेरीमध्ये १२६ वर्षांतील सर्वाधिक तीव्र दुष्काळ; शेती, पाणीपुरवठा आणि ऊर्जा क्षेत्रावर संकट

Maharashtra Drought: भेगाळलेली जमीन अन् उपाशी जनावरे! डॉ. नीलम गोऱ्हेंनी दिले ‘हे’ निर्देश
2

Maharashtra Drought: भेगाळलेली जमीन अन् उपाशी जनावरे! डॉ. नीलम गोऱ्हेंनी दिले ‘हे’ निर्देश

Maharashtra Drought : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहांसोबतच्या भेटीत काय ठरलं?
3

Maharashtra Drought : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहांसोबतच्या भेटीत काय ठरलं?

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट
4

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.