‘एमपीएससी’ आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच (फोटो- सोशल मिडिया)
पुण्यातील एस. एम. जोशी पुलाजवळील गरवारे महाविद्यालय परिसरात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून, शास्त्री रस्त्यावरही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी दि. ९ ऑक्टोबर रोजी या आंदोलनाचा नववा दिवस असून, विविध मागण्यांसाठी विद्यार्थी ठामपणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्त्या काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे ज्येष्ठ मंडळींनी केलेल्या आवाहनाचा मान राखत सोमनाथ चव्हाण, ऋषिकेश गांगुर्डे आणि गजानन शेळके या विद्यार्थ्यांनी आपले उपोषण स्थगित केले. या सर्वांना दूध पाजून त्यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली.
Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा
आमचा लढा अद्याप थांबलेला नाही नसून उलट तो आणखी तीव्र झाला आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही, हा आमच्या आंदोलनाचा निर्धार कायम आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा हा लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरूच राहील असे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले. ऋषिकेश गांगर्डे यांनी गुन्हा दाखल झाला यावरती सांगितले की, १ ऑक्टोबर रोजी इंदूलाल कॉम्प्लेक्स येथे झालेल्या आंदोलनावेळी ते पुणे शहरात किंवा जिल्ह्यातही उपस्थित नव्हते. त्यामुळे आंदोलनाशी संबंधित गुन्ह्यात त्यांचे नाव कसे आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘ग्रुप बी’ परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी एसआयटीला दिलेले काही पुरावे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचे आपण मूळ तक्रारदार असून, पुराव्यांमुळेच प्रकरण समोर आले. मात्र, मूळ आरोपींवर कारवाई करण्याऐवजी आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे ते म्हणाले. अशा दबावाला विद्यार्थी घाबरणार नसून, अन्यायाविरोधात एकजुटीने लढा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण; ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे






