रोहित पवार (फोटो- ट्विटर)
विद्यार्थ्यांवर गंभीर स्वरूपाची कलमे लावण्यात आली असून, एफआयआरमधील दाव्यांबाबत प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असे पवार म्हणाले. ऋषी गांगर्डे हे संबंधित ठिकाणी उपस्थित नसतानाही त्यांचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत पुरविणार असल्याचे सांगत, पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक असल्याची टीका त्यांनी केली.
MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण; ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
न्यायालयीन आदेशाचा दाखला देत पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची आणि त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्याची भूमिका न्यायालयाने घेतल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनासाठी परवानगी मिळावी म्हणून पोलिसांना पत्र दिले असूनही अद्याप परवानगी मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
आधी परवानगी द्यायची आणि नंतर सरकारच्या दबावाखाली ती धुडकावून लावत विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करायचे, हा नेमका कारभार आहे तरी कसा? #MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला पुणे पोलिसांनी आधी परवानगी दिली होती. मात्र, स्वतः दिलेली परवानगी ग्राह्य न धरता सरकारचं ऐकून विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे आज दुसऱ्यांदा सत्याग्रह आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी तीन अर्ज दाखल केले. #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे
#MPSCPuneProtest — Rohit Pawar (@RRPSpeaks) October 9, 2026
एमपीएससीमधील कथित गैरप्रकार आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या मुद्द्यावरून सुरू असलेला लढा संविधानाच्या रक्षणासाठीही असल्याचे पवार म्हणाले. दिल्लीतील आंदोलनाला जाता येत नसल्यास नागरिकांनी पुण्यात येऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने कारवाई केल्यास सामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्रीपदासाठी आंदोलन सुरू असल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना, आपला भर विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि एमपीएससीच्या कारभारावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशांवरही आक्षेप घेतला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जात असताना अन्य ठिकाणी शस्त्रांसह फिरणाऱ्यांवर तितकीच तत्परता दाखवली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने कारवाई केल्यास सामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
MPSC आंदोलनात रोहित पवारांचा पोलिसांना थेट अल्टिमेटम; ’15 मिनिटांत निर्णय घ्या, नाहीतर…’
आंदोलनासाठी जागा बदलण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता, एस. एम. जोशी मार्गावरच आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका पवार यांनी मांडली. आंदोलनासाठी यापूर्वी २ ऑक्टोबर रोजी परवानगी मिळाली होती. पुणेकरांना त्रास होऊ नये, रुग्णालये आणि रहिवासी भागांना अडथळा निर्माण होऊ नये, याचा विचार करूनच या जागेची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी यापूर्वी दिलेली परवानगी रद्द केली असली, तरी त्याच ठिकाणी पुन्हा परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली.






