Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought : जालन्यात दुष्काळाचा मच्छीमारांना मोठा फटका; सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन २० टक्क्यांवर

Maharashtra Drought : जालना जिल्ह्यातील सोमठाणा आणि राजेवाडी तलावांची मंत्री नितेश राणे यांनी पाहणी केली. पाणीपातळी घटल्याने मत्स्यउत्पादनावर मोठा परिणाम झाला असून नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Sep 28, 2026 | 09:55 PM
Nitesh rane Jalna drought

Nitesh rane Jalna drought

Follow Us
Follow Us:
  • सोमठाणा तलावातील मत्स्यउत्पादन ७९ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर
  • नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करण्याचे नितेश राणेंचे आदेश
  • सोमठाणा तलावातील गाळ काढण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना
 

Maharashtra Drought : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी तलाव परिसराची पाहणी करून मच्छीमार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या समवेत जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील राजेवाडी आणि सोमठाणा तलावांमधील पाणीसाठा, मत्स्यव्यवसायाची स्थिती आणि मच्छीमारांचे झालेले नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली.

मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आल्याने दुष्काळाच्या संकटात मच्छिमारांपर्यंतही शासनाची मदत पोहोचविण्याची भूमिका असल्याचे सांगत राणे म्हणाले की, तसेच स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधला. बदनापुर तालुक्यातील राजेवाडी आणि सोमठाणा तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने मत्स्य उत्पादनावर परिणाम झाला आहे. पाणीसाठा आणि मत्स्यव्यवसायावरील परिणामाचे मोजमाप करून पंचनामे करुन त्यानुसार नियमानुसार मदत देण्याची केली जाणार असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी

यावर्षी अपुऱ्या पावसामुळे सोमाठणा तलावातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी मत्स्यउत्पादनावरही त्याचा गंभीर परिणाम झाला असून, गेल्यावर्षीच्या ७९ टक्के मत्स्यउत्पादनाच्या तुलनेत यंदा हे उत्पादन केवळ २० टक्क्यांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून, शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांनाही शासनाच्या माध्यमातून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तलावातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच मच्छीमारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहितीही यावेळी मच्छीमार बांधवांना देण्यात आली. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेऊन उपलब्ध शासकीय योजनांचा उपयोग करून घेण्याचे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.

यावेळी आमदार नारायण कुचे, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, सहाय्यक आयुक्त (भूजल) ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त, छत्रपती संभाजीनगर सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरिमा जाधव यांच्यासह मत्स्यव्यवसाय व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळावर केंद्रीय कृषीमंत्री अॅक्शन मोडवर, ‘या’ दिवशी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार

Web Title: Maharashtra drought jalna somthana lake fishermen loss nitesh rane drought inspection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 09:55 PM

Topics:  

  • drought news
  • jalna news
  • Maharashtra Drought 2026
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी
1

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
2

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश
3

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Rohit Pawar : …तर समृद्धी महामार्ग जाम करू, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा
4

Rohit Pawar : …तर समृद्धी महामार्ग जाम करू, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.