खाऊच्या पैश्यातून वन्यप्राण्यांसाठी पाणी; जातेगावच्या भाऊ बहिणीचा उपक्रम
आजच्या बदलत्या जीवनशैलीत लहान मुलांचे लक्ष खाऊ, मोबाईल, खेळणी आणि वाढदिवसांच्या जल्लोषाकडे अधिक वळलेले दिसते. मात्र पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील दोन भाऊ व दोन बहिणींनी या प्रवाहाला छेद देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. “खाऊ नको, आमच्या मनी बॅकमध्ये पैसे टाका,” अशी आगळीवेगळी विनंती आई-वडील व नातेवाईकांना करत या चिमुकल्यांनी वर्षभर पैसे साठवले आणि त्या पैशांतून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
जातेगाव परिसर हा नगर-पुणे महामार्गालगत असून येथील शिवारात वनविभागाचे विस्तीर्ण पडीक वनक्षेत्र आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. परिणामी वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते. अनेक वेळा प्राणी मानवी वस्तीकडे वळतात, ज्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षांची शक्यता वाढते.
Ahilyanagar News: कर्जतमध्ये भाजपाची ‘इनकमिंग’ वाढवणारे शिंदेंच्या शिवसेनेला झाले कनेक्ट!
लहान वयातच पर्यावरण संवर्धन, प्राणीप्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव ठेवून त्यांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. आज अनेक ठिकाणी वाढदिवस, पार्टी आणि खाऊवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र या दोन भाऊ व दोन बहिणींनी त्या खर्चाला फाटा देत समाजहिताचा विचार केला आहे. त्यांच्या – या कृतीतून “लहान हातांनीही मोठे कार्य घडू शकते” हा संदेश ठळकपणे अधोरेखित होतो.
पाणी टंचाईची समस्या ओळखून हर्षल अदिनाथ फटांगडे (इ. ७ वी), मल्हार विशाल फटांगडे (इ. २ री) हे दोघे भाऊ तसेच आरोही फटांगडे (इ. ६ वी) आणि वृंदा फटांगडे या दोन बहिणीनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी वनक्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी सोडण्याचे व ते भरून ठेवण्याचे नियोजन केले आहे. विशेषत: एप्रिल ते जून या कडक उन्हाळ्याच्या चार महिन्यांत आठवड्यातून किमान दोन वेळा पाणवठे भरले जातील, अशी जबाबदारी त्यानी स्वीकारली आहे. या कामासाठी त्यांनी स्वतः साठवलेले पैसे वापरण्याचा निर्णय घेतला असून, कोणत्याही बाह्य मदतीवर अवलंबून न राहता स्वबळावर हा उपक्रम राबवण्याची त्यांची जिद्द कौतुकास्पद आहे.
Mahabaleshwar ची थंडी उडाली दूर! अवकाळी पावसामुळे पर्यटकांची तारांबळ; वादळी वारे अन्…
जातेगावच्या या भावंडांचा हा उपक्रम केवळ एक सामाजिक कार्य नसून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारा आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे वन्यप्राण्यांना मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यात अशा उपक्रमांची चळवळ उभी राहण्याची आशा व्यक्त होत आहे. प्रेरणेचा वास्सा, कृतीतून साकारलेला संकल्प महत्वाचा आहे. “मी आणि माझी भावंडे आदरणीय जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या गावातील शाळेत शिक्षण घेत आहोत. त्यांच्या कार्यातून आम्हाला समाजसेवेची, पर्यावरण संवर्धनाची आणि प्राणीप्रेमाची प्रेरणा मिळाली.
“मी आणि माझी भावंडे आदरणीय जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या गावातील शाळेत शिक्षण घेत आहोत. वाढदिवस, खाऊ आणि अनावश्यक खर्च टाळून आम्ही वर्षभर पैसे साठवले आणि त्या पैशांतून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. लहान असलो तरी समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव ठेवून हा संकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” अशी भावना या चिमुकल्यांनी व्यक्त केली.






