Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनल’ने २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवत एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 13, 2026 | 02:56 PM
अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश

Follow Us
Follow Us:
  • अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा
  • सोमेश्वरच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना यश
  • विजयामुळे पार्थ-जय पवारांचेही मनोबल वाढले
बारामती/अमोल तोरणे :  बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनल’ने २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवत एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दिवंगत अजित पवार यांनी अनेक वर्षांत बारामती तालुक्यात उभे केलेल्या राजकीय संघटनात्मक ताकदीचा मोठा फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला झाल्याचे दिसून आले आहे. या निकालामुळे सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांचेही मनोबल वाढले आहे.

 

अजित पवार यांच्या निधनानंतरची सोमेश्वर कारखान्याची ही पहिलीच निवडणूक असल्याने सुनेत्रा पवार यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची ठरली होती. विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभे केले, तर युगेंद्र पवार यांनीही स्वतंत्र पॅनलची घोषणा केली. त्यामुळे तिरंगी लढतीत सुनेत्रा पवार यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही या निकालाकडे लक्ष लागले होते.

पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलला पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचा पाठिंबा होता. पुरंदरमधील चार उमेदवारही त्यांच्या पॅनलमधून रिंगणात होते. दुसरीकडे, राष्ट्रवादीला शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे, खंडाळ्याचे मंत्री मकरंद पाटील आणि फलटणचे आमदार सचिन पाटील यांच्या राजकीय समीकरणांचा फायदा मिळाला. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांमधील संपर्क आणि संघटनात्मक ताकद राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली.

जगताप यांनी आपल्या पॅनलला अजितदादांचे नाव दिले होते. मात्र, त्यांच्या भूमिकेवर सुनेत्रा पवार यांनी प्रचारसभांमधून प्रश्न उपस्थित केले. कारखाना कोणाची वैयक्तिक मालमत्ता नसल्याचे सांगतानाच अजितदादांनी कारखाना कर्जमुक्त केल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. युगेंद्र पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर केलेल्या आरोपांना जय पवार यांनी प्रत्युत्तर दिले. उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत सुनेत्रा पवार यांनी रणनीतीवर भर दिला. नाराजांची समजूत काढण्यात आणि पदाधिकाऱ्यांना एकत्र ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आले. प्रचारसभांमधील शक्तिप्रदर्शनानेही पक्षाची संघटनात्मक ताकद दाखवून दिली.

पार्थ-जय पवारांचे मनोबल वाढले

उमेदवारांच्या मुलाखती सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी घेतल्या, तर उमेदवार निश्चितीमध्ये खासदार पार्थ पवार यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा होती. २१ पैकी २१ जागांवरील विजयामुळे पवार कुटुंबातील नव्या पिढीचा आत्मविश्वास वाढला आहे.

हे सुद्धा वाचा : पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ

राष्ट्रवादीचा एकोपा निर्णायक

बारामती तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांची समजूत काढण्यातही पक्षाला यश आले. अजितदादांनी निर्माण केलेल्या राजकीय पायाचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान सुनेत्रा पवार यांच्यापुढे असताना, सोमेश्वरच्या निकालाने त्यांच्या नेतृत्वाची पहिली मोठी परीक्षा अधोरेखित केली आहे.

Web Title: Sunetra pawar has succeeded in thwarting the opposition in the someshwar election nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Election News
  • Someshwar Sugar Factory
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
1

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
2

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
3

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे रणशिंग; जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारासाठी मेळावा
4

कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे रणशिंग; जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारासाठी मेळावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.