
मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात
नाशिक : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान होऊन निकाल आता हाती आले आहेत. या निवडणुकीच्या तयारीसाठी अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणूक जबाबदारी अर्थात इलेक्शन ड्युटी दिली गेली होती. मात्र, यातील काही कर्मचाऱ्यांनी इलेक्शन ड्युटीला दांडी मारली. महापालिका निवडणुकीत ज्या कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि निवडणूक कर्तव्यावर गैरहजर राहिले, त्यांच्यावर प्रशासन आता कडक पावले उचलत आहे.
महापालिका निवडणूक प्रक्रियेसाठी सोपवलेल्या कामातून जाणीवपूर्वक पळ काढणाऱ्या सुमारे २०० सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्पष्ट निर्देशांनुसार, जिल्हा निवडणूक प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली असून, त्यांच्यावर शिस्तभंग आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.
हेदेखील वाचा : KDMC Politics: मनसेचा शिंदेंना पाठिंबा, राज ठाकरे नाराज? संजय राऊतांनी कल्याण-डोंबिवलीतील ‘त्या’ निर्णयावर फोडला बॉम्ब
दरम्यान, कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर गैरहजर असल्याचे आढळले. तर संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस, वेतन कपात किंवा रोखणे, गोपनीय अहवालात नकारात्मक नोंद, विभागीय चौकशी आणि गंभीर प्रकरणांमध्ये निलंबन किंवा फौजदारी गुन्हे दाखल केले जाऊ शकतात.
आरक्षण सोडतीकडे आता सर्वांचे लक्ष
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या. याचे निकालही हाती आले आहेत. त्यानंतर आता महापौरपदासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यातच आता मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आज (दि.२२) आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
नव्या चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या सोडतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आता नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाण्याची जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि खुला प्रवर्ग यांचा समावेश असेल. जर जुन्या चक्राकार पद्धतीचा अवलंब केला, तर यंदा मुंबईचे महापौरपद ‘अनुसूचित जमाती’ प्रवर्गासाठी जाण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: घटस्फोटानंतर पुन्हा थाटणार संसार? सत्तेसाठी ठाकरे-भाजप एकत्र येणार? वाचा सविस्तर…