डोंबिवली जवळील खोणी गावात एका निर्मानाधीन इमारतीमध्ये सुरू असलेल्या बनावट बटर बनवण्याचा कारखान्यावर कल्याण क्राईम ब्रांचने छापा टाकत पर्दाफाश केला. धक्कादायक म्हणजे अत्यंत घाणेरड्या पद्धतीने हा बटर तयार करण्यात येत होता, एका नामांकित कंपनीच्या बॉक्समध्ये हा बटर पॅकिंग करून कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरात सँडविच विक्रेत्यांसह, धाबे हॉटेल्स मध्ये नामांकित बटर असल्याचे भासवून त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी कल्याण क्राईम ब्रांचने पिंटू यादव, प्रेमचंद फेकूराम या दोन जणांना अटक केली. पोलिसांनी बटर बनवण्यासाठी लागणारे साहित्य, मशीनरी, कच्चामाल नामांकित कंपनीच्या कागदि बॉक्ससह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
डोंबिवली जवळील काटई बदलापूर रोडला खोनी गावाजवळ निर्माणाधिन इमारतीमध्ये बनावट बटर बनवले जात असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचचे कर्मचारी दत्ताराम भोसले व गुरुनाथ जरग यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल म्हस्के,पोलीस अधिकारी संदीप चव्हाण,पोलीस कर्मचारी दत्ताराम भोसले,गुरुनाथ जरग,अनुप कामत यांच्या पथकाने खोनी परिसरातील या निर्माणाधिन इमारती मध्ये छापा टाकला. या ठिकाणी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने बटर तयार केले जात होते. धक्कादायक म्हणजे एका नामांकित कंपनीच्या बॉक्समध्ये हे बटर पॅकिंग करून सँडविच हातगाडी, धाबे हॉटेल व्यवसायिकांना नामांकित कंपनीचे बटर म्हणून ते पुरवले जात होते. पोलिसांनी या कारखान्यावर छापा टाकत पिंटू यादव व प्रेमचंद फेकू राम या दोघांना अटक केली. या ठिकाणाहून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध बटर बनवण्याकरता लागणारे साहित्य मशीन कच्चामाल व नामांकित कंपनीच्या कागदी बॉक्स नुसार सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.