रस्त्याच्या कडेला, सोसायटीच्या आवारात, नाक्यावर पार्क केलेल्या बाईक चोरणार्या चोरट्याला कल्याण क्राईम ब्रांचने सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत. रमजान शेख असे या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून आत्तापर्यंत चार दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
एक तरुण चोरीची दुचाकी घेऊन 90 फुटी रोड परिसरात येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचचे मिथुन राठोड आणि विरेंद्र नवसारे यांना मिळाली होती. ही माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदिप चव्हाण, विश्वास माने, दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, अनुप कामत, सचिन वानखेडे, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड आणि विजेंद्र नवसारे यांच्या पथकाने पत्रीपुलाजवळ सापळा रचत रमजान शेख या बेड्या ठोकल्या. त्याने खडकपाडा, वालीव, कोपरखैरणे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचक्यांच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतून 8 गुन्हे नोंद असलेल्या रमजानकडून 4 दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.