Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News : “मुस्लिम नागरिकांना आम्ही घरं देणार नाही” ; कोनगावात अजब फतवा

Kalyan News :  आम्ही मुस्लीम नागरिकांना घरं देणार नाही असा अजब फतवा काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.  कल्याणमध्ये घर विक्री संदर्भातील एका फोन कॉलवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 08, 2026 | 07:58 PM
Kalyan News : “मुस्लिम नागरिकांना आम्ही घरं देणार नाही” ; कोनगावात अजब फतवा
Follow Us
Follow Us:
  • “मुस्लिम नागरिकांना आम्ही घरं देणार नाही”
  • कोनगावात अजब फतवा
ठाणे :  आम्ही मुस्लीम नागरिकांना घरं देणार नाही असा अजब फतवा काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.  कल्याणमध्ये घर विक्री संदर्भातील एका फोन कॉलवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मुस्लिम नागरिकांना घर विकली जाणार नाही हे ऐकताच एम आय एम शहराध्यक्ष अश्फाक शेख यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शुक्रवारी दुपारी अश्फाक शेख यांना एका व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने कोनगाव परिसरातील महामार्गालगत असलेल्या एका इमारतीबाबत माहिती देत स्वस्त दरात घर उपलब्ध असल्याचे सांगितले. घराची किंमत, पेमेंट क्षमता आणि इतर तपशीलांवर दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर अश्फाक शेख यांनी “या ठिकाणी मुस्लिम लोकांना घर मिळेल का?” असा प्रश्न विचारला.

यावर समोरच्या व्यक्तीने “मुस्लिम लोकांना घर मिळणार नाही” असे स्पष्ट सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे उत्तर ऐकल्यानंतर संतप्त झालेल्या अश्फाक शेख यांनी संबंधित व्यक्तीला, “माझं नाव आणि नंबर माहिती असताना मला फोन कसा केला?” असा सवाल केला. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करत कॉल कट केल्याचे सांगितले जात आहे.

Mira Bhayander : शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं; “दुरुस्ती करून त्याच जागी उभारणार” नरेंद्र मेहता यांचं आश्वासन

या घटनेनंतर अश्फाक शेख यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित व्यक्तीची ओळख, तो ज्या बिल्डर किंवा प्रोजेक्टचे नाव घेत होता त्याची सत्यता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोण आहे का याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.“मुस्लिम लोकांना घर मिळणार नाही असे सांगणारे नेमके कोण आहेत?” असा सवालही कल्याण शहर एम आय मध्ये अध्यक्ष अश्फाक शेख यांनी उपस्थित केला आहे. आता या प्रकरणात पोलिस कोणती भूमिका घेतात आणि चौकशीत काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागले आहे.

Mira Bhayander : अतिक्रमण झालेल्या झोपड्यांना भीषण आग; निष्काळजीपणामुळे महानगरपालिकेवर टीकेची झोड

Web Title: Kalyan news we will not give houses to muslim citizens strange announcement in kongaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • kalyan news
  • navrashtra news
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप
1

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला
2

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट
3

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट

मॅगीच्या पाकिटात किडे सापडल्याचा आरोप; Nestle India ने हात झटकले? दिलं मोठं स्पष्टीकरण
4

मॅगीच्या पाकिटात किडे सापडल्याचा आरोप; Nestle India ने हात झटकले? दिलं मोठं स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.