
Thane water pipeline leak
#WATCH | Thane, Maharashtra | Municipal administration conducts repair work to restore a major leak detected in the Mumbai-III water pipeline located along the Eastern Express Highway in the Teen Hath Naka area of Thane. BMC Officials say, “Given that this is a critical water… pic.twitter.com/91786MEobg — ANI (@ANI) August 14, 2026
BMC अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ३,००० मिमी व्यासाची ही अत्यंत महत्त्वाची जलवाहिनी असल्यामुळे त्याचा पाणीपुरवठ्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्यातरी पाण्याची गळती थांबवणे हेच मोठे कार्य महापालिकेच्या हातात आहे. आधीच १० टक्के पाणी कपात, त्यात जर आज पाणी घराघरात पोहोचले नाही तर मोठा त्रास सामान्य लोकांना सोसावा लागेल. त्यासाठी BMC ला त्वरित जलवाहिनी पूर्ववत करावी लागेल, जेणेकरून मुंबईकरांना पाण्याची टंचाई सोसावी लागणार नाही.
मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा आता ८८.८१ टक्क्यांवर पोहोचला असला तरी, त्यात एकूण १२.८५ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जवळपास ७ एप्रिलपर्यंत हा पाणीसाठा मुंबईकरांसाठी पाण्याचा उपयोग करू शकतो. तरीसुद्धा महापालिका प्रशासनाने असे स्पष्ट केले आहे की, आढावा घेऊनच पाणी कपात कमी करता येईल. त्यामुळे सध्यातरी १० टक्के पाणी कपात सुरू ठेवण्यात आली आहे.ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाचा आढावा घेऊनच अंदाज बांधला जाईल कि पाण्याची दिशा काय असेल १०% पाणीकपात ठेवायची कि नाही.कारण जुलै महिन्यात पाण्याची स्थिती चांगली नव्हती त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेलता गेला.पाणलोट क्षेत्रांत पाणी किती साठा होईल त्या बद्दल शंका होती पण पावसाने उशिरा का होईना महाराष्ट्रावर मेहरबानी केली.
Ans: ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या बाजूला मुंबई III जलवाहिनीला गळती लागली आहे.
Ans: या गळतीमुळे मुंबई परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Ans: होय. मुंबईत सध्या १० टक्के पाणीकपात सुरू आहे.