
दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधीतून लाभार्थ्यांना दुचाकी देण्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम घेतलेल्या एजी डॉटर्स कंपनीने तीन एकर जागा भाडे करारावर घेतली. मात्र, जागेचे भाडे नगर पंचायतला अद्यापही दिलेले नाही. कंपनीने नगर पंचायतची फसवणूक केली असून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असा ठरावही घेण्यात आला.
कणकवली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आयोजित केली होती. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, नगरसेवक रुपेश नार्वेकर, सुप्रिया नलावडे, सत्यजित उर्फ बाळू पारकर, दीपिका जाधव, सुमेधा अंधारी, जाई मुरकर,संकेत नाईक, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे, बंडू हर्णे, राकेश राणे, संजय कामतेकर, स्वप्नील राणे, मेघा गांगण, आर्या राणे, मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, प्रतीक्षा सावंत यांच्यासह न. पं. चे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम व अन्य अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
KDMC News : अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाणी मिळेना; MIDCचा पाणी बिलावर ‘डिपॉझिट’ धक्का!
नगररचना विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऑन फिल्ड काम न करता कणकवली शहराच्या प्रारुप विकास आराखडा तयार केला आहे. त्यामुळे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आराखडयात चुकीच्या पद्धतीने आरक्षणे टाकली गेली आहेत. या आराखडयात अनेक त्रुटी आहेत. या आरखडयाला शहरवासीयांचा विरोध आहे. प्रसिद्ध झालेल्या आराखडयावर २३ मार्चपर्यंत नागरिकांना हरकती घेण्याची मुदत आहे. नागरिकांना हरकती घेण्यासाठी शासनाने दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी. तसेच त्रुटी असलेला डीपी प्लॅन रद्द करावा, असे ठराव कणकवली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आले.
शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जीर्ण झाली आहे. याचे पुनर्जिवन करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. तसेच नळपाणी योजना, भूयारी गटार, ड्रेजेनची व्यवस्था करण्यासाठी नवीन डीपीआर करण्याची गरज असल्याचे संदेश पारकर यांनी सभागृहाला सांगितले. नवीन डीपीआर करण्यास बंडू हर्णे यांनी आक्षेप घेतला. जुन्या डीपीआरनुसार नळपाणी, भूयारी गटार, ड्रेजेनची व्यवस्था करण्यासाठी आलेले २८ कोटी वाया जाणार असल्याची त्यांनी निदर्शनास आणून दिली. यावर नवीन डीपीआर सुधारित स्वरुपाचा असून प्राप्त झालेल्या निधी शासनाकडे परत जाणार नाही,अशा स्वरुपाचा बनवला जाणार असल्याचे अभियंता सचिन नेरकर यांनी सांगितले.
एमएनजीएल कंपनीने नगरपंचायतीची कोणतीही परवनागी न घेता काम सुरू केले आहे, ही बाब राकेश राणे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. संबंधित कंपनीला प्रशासनाने नोटीस काढावी, अशी सूचना संदेश पारकर यांनी केली. भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम व शहरातील वीज विषयक समस्यांवरून नगरसेवकांनी महावितरणचे अभियंता ओमकार स्वामी यांना धारेवर धरले. शहरात अनेक ठिकाणी ट्रान्सफार्मर उघडया स्थितीत आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असून ट्रान्सफार्मर सुरक्षित करण्यात यावेत, अशी सूचना संकेत नाईक यांनी केली.
शहरातील कचरा व्यवस्थापन बिघडले आहे. व्यवस्थापनावर प्रशासनाचे मॉनेटरिंग नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. कचरा व्यवस्थापन योग्यरित्या होण्यासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करावे, अशी सूचना नगरसेवकांनी मुख्याधिकाºयांना केली. सत्ताधारी पक्षातील एक कार्यकर्ता कचरा व्यवस्थापनावर अकुंश ठेवत असून फक्त सत्ताधारी नगरसेवकांच्या वाडार्तील कचरा उचलण्यासाठी कर्मचाºयांवर दबाव टाकत आहे. विरोधी गटातील नगरसेवकांच्या वार्डात कचरा उचलण्यासाठी टाळाटाळ करीत आहे, असा आरोप करत त्यांना पुरस्कार देण्याची गरज असल्याचे मेघा गांगण यांनी सांगितले. यावरून सुमेधा अंधारी व मेघा गांगण यांच्यात वादंग झाला. आर्या राणे, मनस्वी ठाणेकर यांनी कचरा उचलण्याच्या मुद्यावर प्रशासनाला जाब विचारला.
ADR Reports: देशाच्या वरिष्ठ सभागृहात १६ टक्के ‘गंभीर’ गुन्हेगार; एडीआर अहवालातून धक्कादायक खुलासे
शहरातील विकासकामे करण्याचा ठेका घेतलेला ठेकेदार कामे वेळेत पूर्ण करीत नाही, ही बाब सत्यजित पारकर यांनी निदर्शनास आणून देत संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. यावेळी ठेकेदार वेळेत काम पूर्ण करत नसेल तर त्याला काळ्या यादीत टाका.तसेच कायार्रंभ आदेश देऊनही ठेकेदाराने काम पूर्ण केले नसेल तर त्या कामाची निविदा प्रक्रिया पुन्हा करा,असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले. किनई रोडवरील खड्डे बुजविण्यासाठी ४० लाखांची निविदा काढल्याचे वृत्त सोशल मीडियावर आले असल्याचे बंडू हर्णे यांनी सभागृहात सांगितले. तर हे वृत्त खोटे असल्याचे सांगत त्याबाबत पुरावे द्यावेत असे बाळू पारकर यांनी सांगितले. या मुद्द्यावरूनही काहीवेळ वादंग झाला.
शहरातील कचरा गोळा करण्यासाठी आणि जमा झालेला कचरा प्रकल्पात नेण्यासाठी वापरल्या जाणाºया नगरपंचायतीच्या १२ वाहनांचा इन्शुरन्स भरण्यात आलेला नाही, ही बाब बंडू हर्णे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावरून संदेश पारकर यांनी सोनाली खैरे यांना जाब विचारून न भरलेल्या वाहनांचा इन्शुरन्स त्वरित भरण्यात यावा, अशी सूचना केली. शहरातील गार्डनची झालेली दुरवस्था अन् गार्डनमध्ये प्रेमी युगलांचे गैरवर्तन सुरू असल्याची बाब मेघा गांगण, आर्या राणे, मेघा सावंत यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. त्यामुळे उद्यान सुरू राहण्याची वेळ निश्चित करून इतर वेळी ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेच्या आरंभी विभव करंदीकर यांनी शहरातील विकासकामांची यादी वाचून दाखवली. तर आणखीन कामे नगरसेवकांनी सुचवावीत, असे संदेश पारकर यांनी सांगितले.