Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा, वीज कार्यालयावर धडक

Protest Against Smart Meter In Karad: कराडमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवर ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात वीज वितरण व तहसील कार्यालयावर धडक देत स्मार्ट मीटर सक्ती थांबवणे, पूर्वीचे मीटर पुन्हा बसवणे आणि वीजपुरवठा खंडित करण्याची पद्धत बंद करणे अशा मागण्या करण्

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 22, 2026 | 08:53 PM
स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा, वीज कार्यालयावर धडक
Follow Us
Follow Us:
  • स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा
  • वीज कार्यालयावर धडक
  • रास्तारोकोचा इशारा
कराड : – स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करत विविध सामाजिक, शेतकरी आणि राजकीय संघटनांनी सोमवारी कराडमध्ये जनआक्रोश मोर्चा काढत वीज वितरण कार्यालय आणि तहसील कार्यालयावर धडक दिली. स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने थांबवावी, आधी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पारंपरिक मीटर पुन्हा बसवावेत, तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्याची पद्धत बंद करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Maharashtra Rain Alert: सावधान! 48 तास धोक्याचे? कोकणात पाऊस आक्रमक होणार, तर…

शहरातील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातून मोर्चास प्रारंभ झाला. वीज वितरण कार्यालयासमोर मोठ्या संख्येने शेतकरी व विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार व रवी बडेकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ, राष्ट्रवादी युवा कराड तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, जान फाउंडेशनचे जावेद नायकवडी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी वीज वितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मोर्चेकरी पायी चालत प्रशासकीय कार्यालयात पोहोचले आणि अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

यावेळी बोलताना पं.स. सदस्य संग्राम पवार यांनी, सातारा जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. शेतीपंपांची वीज तातडीने सुरू करावी, तसेच ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

भीमशक्तीचे आनंदराव लादे यांनी, बाहेरच्या राज्यांमध्ये २०० युनिट फ्री आहे, तसे महाराष्ट्रात का होत नाही? त्याचाही ठराव महाराष्ट्र शासनाने करावा, अशी मागणी केली. तसेच स्मार्ट मीटर सक्तीचे धोरण सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार टाकणारे असून, ग्राहकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.

राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांनी, येणाऱ्या पावसाळी आदेशनात सक्तीने स्मार्ट मीटर न बसवण्याबाबतचा ठराव घेण्यात यावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

निवेदन स्वीकारल्यानंतर प्रशासकीय कार्यालयाबाहेर पुन्हा एकदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. स्मार्ट मीटरविरोधातील जनतेचा वाढता रोष लक्षात घेऊन शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा कोल्हापूर नाका येथे शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात लवकरच रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विविध सामाजिक, शेतकरी आणि राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिला. यावेळी कादरभाई नायकवडी, सुवर्णाताई विठुळे, शामराव मोहिते, दत्तात्रय दुपटे, संजय कांबळे, भीमशक्ती वाहतूक सेनेचे फिरोज सावकार आदी उपस्थित होते.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

Web Title: Karad smart meter protest jan aakrosh morcha electricity board farmers agitation maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • Karad
  • Karad news
  • Mahavitaran Department

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलाने स्वतःच रचला अपहरणाचा बनाव; पोलिसांच्या तत्परतेने बनाव उघड
1

अल्पवयीन मुलाने स्वतःच रचला अपहरणाचा बनाव; पोलिसांच्या तत्परतेने बनाव उघड

FDA ची पुन्हा मोठी कारवाई; कराडातील दोन हॉटेल्सना तात्पुरते बंदचे आदेश
2

FDA ची पुन्हा मोठी कारवाई; कराडातील दोन हॉटेल्सना तात्पुरते बंदचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.