Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad Burning Car: कृष्णा पुलावर मध्यरात्री धावत्या कारने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

घटनेमुळे कृष्णा पुलावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या, तर जळणारी कार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 11, 2026 | 11:01 AM
Karad Car Fire Accident,Karad News,Car Fire Incident

Karad Car Fire Accident,Karad News,Car Fire Incident

Follow Us
Follow Us:
  • कृष्णा पुलावर गुरुवारी मध्यरात्री धावत्या कारला अचानक आग लागली
  • इंजिनच्या भागातून धूर येऊ लागला
  • चालकाला परिस्थितीची चाहूल लागताच त्याने तत्काळ वाहन थांबवले
Satara News: कराड-विटा मार्गावरील कृष्णा पुलावर गुरुवारी मध्यरात्री धावत्या कारला अचानक आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. कारमधून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वाहन तातडीने पुलाच्या कडेला उभे केले आणि स्वतःसह सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास कराड-विटा मार्गावरून सैदापूर येथील कृष्णा कॅनॉल बाजूकडून कृष्णा नाका बाजूकडे कार प्रवास करत असताना अचानक इंजिनच्या भागातून धूर येऊ लागला. चालकाला परिस्थितीची चाहूल लागताच त्याने तत्काळ वाहन थांबवले. काही क्षणांतच कारने पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण वाहनाला वेढा घातला.

TV Actor Arrested: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला POCSO अंतर्गत अटक

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने कराड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला आणि कराड शहर पोलिसांना कळविले. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होताच त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

घटनेमुळे कृष्णा पुलावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या, तर जळणारी कार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. कराड शहराला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली

दरम्यान, कारला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाडाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Karad vita road krishna bridge moving car catches fire saidapur passengers safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Car Fire
  • Karad news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना
1

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी
2

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील
3

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
4

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.