Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Municipal Council: कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा बोजवारा! प्रकल्प बंद पडल्याने परिसरात दुर्गंधी

Karjat Municipal Council: कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा बोजवारा उडाला असून, प्रकल्प बंद पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम स्थानिक नागरिकांना होत आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नगरपालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 20, 2026 | 03:06 PM
कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा बोजवारा! प्रकल्प बंद पडल्याने परिसरात दुर्गंधी

कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा बोजवारा! प्रकल्प बंद पडल्याने परिसरात दुर्गंधी

Follow Us
Follow Us:
  • कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा बोजवारा!
  • प्रकल्प बंद पडल्याने परिसरात दुर्गंधी
  • ठेकेदाराचा मनमानी कारभार
कर्जत: कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ आठ कर्मचाऱ्यांवर भार असून कचऱ्याचे व्यवस्थापन वेळेवर होत नाही आणि त्यामुळे गुंडगे परिसरात दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गुंडगे येथील घनकचरा प्रकल्प सध्या बंद अवस्थेत असून, येथे ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे कामकाज केवळ आठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू असल्याने संपूर्ण व्यवस्था कोलमडली असून, कचऱ्याच्या ढिगांमुळे पसरलेल्या दुर्गंधीने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. कर्जत तालुक्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन गुंडगे येथे घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला आहे. (Karjat Municipal Council)

घनकचरा प्रकल्प केवळ कचऱ्याच्या डेपोत रुपांतर

कर्जत तालुका हा ग्रामीण भाग असल्याने दैनंदिन खरेदी-विक्रीसाठी तालुक्यातील नागरिक मुख्य केंद्रस्थानी असलेल्या कर्जत शहरात मोठ्या संख्येने येतात. परिणामी, कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. मात्र, हा कचरा उचलून त्याचे योग्य वर्गीकरण, प्रक्रिया आणि शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे नगरपालिकेला व संबंधित ठेकेदाराला सध्या शक्य होत नसल्याचे चित्र आहे. गुंडगे प्रकल्पाची अवस्था पाहता या घनकचरा प्रकल्पाचे केवळ ‘कचऱ्याच्या डेपो’त रूपांतर झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sambhajinagar Recruitment News : संभाजीनगर महापालिका भरतीचा निकाल वादात; CCTV तपासणीत ५० उमेदवारांचे बिंग फुटले

अस्वच्छतेमुळे नागरिकांना नाहक त्रास

प्रकल्प परिसरात साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अस्वच्छतेमुळे परिसरात लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, एकीकडे नगरपालिका ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे कर्जत शहर आणि गुंडगे परिसर कचऱ्याच्या विळख्यात अडकल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. या प्रकरणाबाबत कर्जत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना विचारणा केली असता मी रजेवर आहे या संदर्भात मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

कर्जत नगरपालिका प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी, बंद अवस्थेत असलेला गुंडगे येथील घनकचरा प्रकल्प त्वरित सुरू करावा आणि आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करून कचऱ्याचे योग्य विलगीकरण व प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन दोषी ठेकेदारावर कारवाई करणार का, की घनकचरा प्रकल्पावरील हा बोजवारा असाच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uttan Fishermen Attack: भर समुद्रात उत्तनच्या मच्छिमारांवर हल्ला; लाकडी दांडक्यांनी मारहाण, मासळी-जाळी लुटल्याचा आरोप!

💡

Frequently Asked Questions

  • Que: कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाची सध्याची स्थिती काय आहे?

    Ans: कर्जत नगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद पडल्याने कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • Que: प्रकल्प बंद पडल्यामुळे नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे?

    Ans: प्रकल्प बंद असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, स्थानिक नागरिकांना अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

  • Que: घनकचरा प्रकल्पाच्या दुरवस्थेला कोण जबाबदार आहे?

    Ans: ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे प्रकल्पाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी नगरपालिकेच्या प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Karjat municipal council solid waste project shut down contractor negligence sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • raigad

संबंधित बातम्या

जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा
1

जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा

Raigad News: खोपोली-पनवेल-बेलापूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली; एनएमएमटी बसफेऱ्या अपुऱ्या, विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल
2

Raigad News: खोपोली-पनवेल-बेलापूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली; एनएमएमटी बसफेऱ्या अपुऱ्या, विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल

आरोग्य, शिक्षण अन् पर्यावरण क्षेत्रात मोठे परिवर्तन; ‘माझी वसुंधरा अभियाना’त पालघरच्या नावझे गावाचा गौरव
3

आरोग्य, शिक्षण अन् पर्यावरण क्षेत्रात मोठे परिवर्तन; ‘माझी वसुंधरा अभियाना’त पालघरच्या नावझे गावाचा गौरव

सावंगी बायपासवरील लुटमारीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
4

सावंगी बायपासवरील लुटमारीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.