कर्जत/संतोष पेरणे: दिवाळी म्हणजे रोषणाई आणि आनंदाचा सण या दिवसात शेतीची कामं पूर्ण होऊन पीक जोमने वाढलेलं असतं. मात्र यंदा ऐन दिवाळीत बळाराजाचं दिवाळं निघालं आहे. कर्जत तालुक्यात 16ऑक्टोबर रोजी सरत्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे तालुक्यातील कडाव परिसरात चक्री वादळ आले आणि त्यात भाताच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.कडाव पंचक्रोशीमधील दहा गावात शेतीचे मोठे नुकसान झाले असून दिवाळी सण सुरु असताना शेतकरी मात्र शेतात चिखलात भाताचे पीक काढण्यात व्यस्त आहेत.दरम्यान शेतीचे 15 दिवसात पुन्हा नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यामधील 90% शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली असून पूर्ण संपूर्ण कापणीसाठी आलेले भात जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. वर्षातून एकदाच भारताचे पीक घेतले जाते त्यातच संपूर्ण शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत ही अशी जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच सतत होणाऱ्या नुकसानी मुले शेतकरी शेती व्यवसायापासून दूर जायला लागला आहे.तालुक्यातील सहा मे पासून सुरू झालेला पाऊस थांबल्यामुळे नाव घेत नाही.कर्जत तालुक्यात दोन दिवस वादळी वारे आणि सोबत आलेला पाऊस यामुळे भाताच्या शेतीमध्ये उभे असलेले पीक संकटात आले आहे.भाताचे पीक शेतामध्ये कोसळले असल्याने भाताची शेती करणाऱ्या बळीराजा संकटात सापडला आहे.
त्यात आता 16 ऑक्टोबर रोजी आलेल्या चक्री वादळ आणि नंतर झालेला पाऊस यामुळे कडाव परिसरातील अनेक गावातील शेतकरी संकटात आले आहेत.कडाव,नसरापूर,अंजप,या तीन ग्रामपंचायती मध्ये चक्रीवादळ आले होते आणि त्यावेळी पिवळे सोने म्हणून पाहणारे भाताचे पीक शेतात कोसळले.भाताचे पीक पूर्ण बहरात असताना पावसाने त्यावेळी केलेली बॅटिंग यामुळे आजही शेतात पाणी भरले आहे.ते पाणी आजही शेतात असल्याने भाताचे पीक शेतात जमिनीवर कोसळले असून त्या भाताच्या पिकाला पाण्यात भिजल्याने मोड येण्याची शक्यता आहे.भिजलेले भाताचे पीक खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून यावर्षी कडाव परिसरातील दहा गावातील शेतकरी शेतात भाताची पीक बाहेर कादहन्यात व्यस्त आहेत. शेतकरी आपली दिवाळी शेतातील पाण्याने भरलेले पीक बाहेर काढण्यात व्यस्त असल्याने या शेतकऱ्यांची दिवाळी शेतात जात असल्याचे चित्र आहे.नसरापूर,सालवाड,चांदई,भातगाव,वडवली,वावळोली,कडाव,टाकवे,वंजारवाडी,अंजप या भागातील शेतकरी शेतात व्यस्त आहेत.