Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : शेतकऱ्यांचा अडवला रस्ता अन्… मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुपुत्राचा पराक्रम; नेमकं घडलं तरी काय ?

तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ यांची मानकीवली या गावी स्वतःची अशी जमीन आहे.आता त्यांच्या सुपुत्राच्या नावावर देखील मोठी जमीन पोशिर गावी आढळून आली असून या मंत्री पुत्राने येथे चांगलेच पराक्रम गाजवले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 16, 2026 | 02:32 PM
Karjat News : शेतकऱ्यांचा अडवला रस्ता अन्… मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुपुत्राचा पराक्रम; नेमकं घडलं तरी काय ?
Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांचा अडवला रस्ता अन्…
  • मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुपुत्राचा पराक्रम
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ यांची मानकीवली या गावी स्वतःची अशी जमीन आहे.आता त्यांच्या सुपुत्राच्या नावावर देखील मोठी जमीन पोशिर गावी आढळून आली असून या मंत्री पुत्राने येथे चांगलेच पराक्रम गाजवले आहेत. मंत्र्यांच्या सुपुत्राचे कारनामे समोर आले असून त्यांनी येथील जमिनीवर दगडी कुंपण घालण्यास सुरुवात केली असून आजुबाजूच्या शेतकऱ्यांचा रस्ता अडविला आहे. दरम्यान,रस्ता अडवला गेल्याने शेतकरी अडचणीत आला असून त्यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली असून दाद मागण्यासाठी कर्जत तहसीलदार यांना निवेदन दिले.

कर्जत तालुक्यातील पोशीर गावातील स्थानिक शेतकरी परशुराम गोपाळ हाबळे यांची शेती सध्या अडचणीत आली आहे. त्यांच्या शेतीकडे जाण्याचा रस्ता दगडी बांधकाम सुरू करून अडवण्यात आले आहे. मागील आठ ते दहा दिवसात तेथे बांधकाम करून शेतकऱ्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे.पूर्वीपासून शेतीसाठी लागणारी अवजारे नेण्यासाठी वापरला जाणारा रस्ता अडवण्यात आला आहे. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी हा रस्ता खुला करण्यात यावा यासाठी 16 मार्च रोजी कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांना पत्र देण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या किसान क्रांती संघटना यांच्याकडून शेतकरी तुकाराम हाबळे यांच्या उपस्थितीत न्याय मिळवून देण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती. हाबळे यांच्या मालकीच्या शेतीमध्ये कुंपण घालण्यासाठी खोदकाम करण्यात येऊ लागले,कोणीतरी खोदकाम करीत आहे हे समजल्यावर हाबले हे आपल्या शेतीकडे गेले असताना तेथे असलेल्या व्यक्तींनी तुकाराम हाबळे यांना धमकावले आणि पुन्हा इकडे यायचे नाही असे सुनावले आणि पाय तोडू अशी धमकी दिली. याबाबत शेतकरी पोलीस ठाण्यात पोहचले असता कोणीही दखल घेत नव्हता.

Mira Bhayander :”प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर…”; भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर वाद चिघळळा; पुर्वेश सरनाईकांनी केली टीका

त्यानंतर शेतकऱ्यांनी माध्यमांना ही बाब सांगितल्यावर संबंधित ठिकाणी पोहचल्यावर सदर जमीन ही राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या नावे असल्याचे समजले. याच मंत्री महोदयांची मानकिवली येथे देखील जमीन असून मंत्र्याच्या सुपुत्र असल्याने पोलिस आणि महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या अन्यायाला न्याय देऊ शकत नाहीत.अधिकारी हतबल असल्याने शेतकऱ्याच्या पाठीशी किसान क्रांती संघटना उतरली असून मंत्र्यांचा मुलगा असला तरी आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार असा निर्धार किसान क्रांती संघटनेने केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन किसान क्रांती संघटनेने पाहणी केली असता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जमीन देखील मंत्र्यांच्या सुपुत्रच्या चेल्यांनी बळकावली असल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी तेथे काम पाहणारे मंत्र्याचे सुपुत्राचे चेले हे आमचे कोणीही काहीही करू शकत नाही,आमच्या पाठीशी कोण आहे हे तुम्हाला माहिती नाही,पत्रकार पण काही करू शकत नाहीत अशा बढाया मारल्या आहेत.

जमिनीवर केले जात असलेल्या अतिक्रमण प्रकरणी कळंब येथील आऊट पोस्टमध्ये शेतकरी रोशन तुकाराम हाबळे पोहचले असता त्यांना देखील पोलिसांना थारा दिला नाही. त्यानंतर कळंब येथे शासनाचे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान सुरू असताना संबंधित शेतकरी तेथे पोहचले. त्यावेळी तहसीलदार जाधव यांनी मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांना तत्काळ पंचनामा करावा आणि अहवाल सादर करावा असे सूचित केले.मात्र आठ दिवसात मंडळ अधिकारी देखील त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी पोहचले नाहीत.

रोशन तुकाराम हाबळे,शेतकरी
आमच्या शेतीकडे आल्यावर आम्हाला दमदाटी व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.त्यामुळे राब भरण्याची वेळ आलेला आहे.सध्याच्या दिवसात भात शेती करण्यासाठी राब जाळला जातो,मात्र इथे आल्यावर आमच्या वडिलांवर दमदाटी करतात किंवा जीवे मारण्याचे धमक्या देतात.त्यामुळे आमचे वडील शेत जमिनीकडे येत नाही. साजिद हसन मुश्रीफ यांचे नावे आजूबाजूची जमीन असून शेतकऱ्यांना शेती मध्ये जाण्याची बंदी घातली गेल्याने आमची जमीन हडपण्याचा त्यांचा डाव दिसतोय.

जिजाबाई वामन राणे,शेतकरी पोशीर
जंगल जमीन विकली असता शेतजमीन ही लाटण्याचा प्रयत्न मंत्री हसीन मुश्रीफ यांचा आहे.आम्ही सातबारा उतारा यावरील लागवडीखाली नसलेली जमीन विकण्यात आली होती.मात्र त्यांनी सर्व जमीन हडपलेली असून माझी जमीन मी 35 वर्षे जुनी असून तेथे माझ्या जमिनीत झोपडी असून ही जागा पण माझी आहे मी विकली नाही. त्यामुळे मी इथून झोपडी काढणार नाही. माझी झोपडी ही मोडण्याचा प्रयत्न केला.मंत्री हसीन मुश्रीफ यांनी या अन्यायाला जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांचा रस्ता ही अडवणूक केली जात आहे. रस्ता आढळल्यानंतर शेतकरी शेती करणार प्रसाद असाही सवाल या महिलेकडून केला जात आहे. आमच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्याचा वापर करत होते असेही या महिलेकडून सांगण्यात आले.

Satara Zilla Parishad : सातारा जिल्हापरिषद सभेकडे सर्वांच्याच नजरा; सभा शांततेत होणार की वादळी होणार?

Web Title: Karjat news minister hassan mushrifs son blocked the road how can farmers go to their farms after fencing the land

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • karjat news
  • Marathi News
  • political news

संबंधित बातम्या

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
1

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!
2

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा
3

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री
4

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.