
कर्जत शहरातील मुरबाड रस्त्यालगत असलेला रस्ता खुला करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उपोषण सुरू करण्यात आले आहे. या पक्षाचे शहर अध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी उपोषणा सुरू केले असून त्यांच्या उपोषणाला तालुका अध्यक्ष शंकर भुसारी,पक्षाचे प्रदेश संघटक विजय मोहिते यांच्यासह दशरथ मुने,अनुकूल भगत,महेश खडे,आनंद लोकरे,सूर्यकांत वायदंडे यांच्यासह अनेक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.पालिकेचे अधिकारी हे नियम भंग करून रस्ता खुला करीत नाहीत. त्यामुळे पालिकेने नियमानुसार कारवाई करून डी पी खुला करावा. कर्जत ते भिसेगाव मार्गे जाणारा पनवेल जुना हायवे कडील रस्ता पुढील 15 दिवसात खुला करणेचे मागणी साठी कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात उपोषण सुरू करण्यात आले आहे.
Raigad News : धावत्या बसचं चाक निखळलं अन्… आगार व्यवस्थापकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ
उपोष्णकर्ते कर्जत शहर अध्यक्ष ॲड मोरे यांनी कर्जत नगर परिषदेचे हददीतील जुना कर्जत-पनवेल हायवे म्हणजेच स.नं.52/4 च्या लगतला असलेल्या 15 मीटर डी. पी. रोड हडप करण्याचा डाव आखला आहे.हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून वाहनांसाठी खुला करणे आणि कर्जतच्या चार फाटा चौकात सतत जीवघेणे ट्राफिकने वायुप्रदुषणास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी आहे. कर्जत नगरपरिषद मधील मुख्याधिकारी पासून अभियंता व नगररचना विभागाचे संबंधीत लोकांना पाठीशी घालत असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ॲड मोरे यांनी केली आहे. उपोषण सुरू झाल्यानंतर देखील प्रशासन कारवाई करणार नसेल तर आमचे शिष्टमंडळ पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांची भेट घेतील आणि सर्व माहिती त्यांच्या कानावर घालतील असा इशारा ॲड मोरे यांनी दिला आहे.
Matheran News : इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा उत्सव! माथेरानचा 176 वा वाढदिवस दिमाखात साजरा