Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : टोरेंटबाबत ग्रामस्थांचा आक्षेप; ग्रामपंचायती प्रकल्पाला गो बॅकचे निर्देश

तालुक्यातील दोन आणि पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणी टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. यातील 3000 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला असून तेथील ग्रामपंचायत कडून प्रकल्प रद्द करावा अशी भूमिका घेतली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 20, 2026 | 03:28 PM
Karjat News :  टोरेंटबाबत ग्रामस्थांचा आक्षेप; ग्रामपंचायती प्रकल्पाला गो बॅकचे निर्देश
Follow Us
Follow Us:
  • टोरंटबाबत ग्रामस्थांचा आक्षेप
  • ग्रामपंचायती प्रकल्पाला गो बॅकचे निर्देश
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील दोन आणि पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणी टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. यातील 3000 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला असून तेथील ग्रामपंचायत कडून प्रकल्प रद्द करावा अशी भूमिका घेतली आहे. मात्र कोणत्याही प्रकारचे दाखले दिलेले नसताना तेथील जमिनीवर कोणत्या अधिकारात घुसघोरी करून प्रकल्प साकारत आहे असा प्रश्न समोर आला आहे. स्थानिक आदिवासी लोकांना दररोज टोरंट कंपनीसाठी काम करणारे अधिकारी आणि कामगार यांच्याकडून दबावाला सामोरे जावे लागत आहे.

पालीतर्फे कोतवाल खलाटी आणि ढाक येथे टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. स्थानिक पातळीवर कोणीही या प्रकल्पाला पाठिंबा दिलेला नाही. स्थानिक ग्रामपंचायतीने विरोध केला असून ग्रामपंचायतीने या प्रकल्पाला गो बॅक असा सूचक इशारा आपल्या ठरावद्वारे दिला आहे. मात्र त्या ठिकाणी जंगलात वस्ती करून राहणारे आदिवासी लोकांना टोरंट कंपनीच्या दादागिरीमुळे जगणे मुश्किल झाले आहे.येथील आदिवासींच्या जमिनीवर टोरंट पॉवरचा शिरकाव केला आहे. आपली चौथी पिढी असलेले आदिवासी लोकांना वन विभागाने दळी भूखंड वन हक्क कायद्याद्वारे दिले आहेत. मात्र ते वन हक्क दावे आता वन विभागाला आणि शासनाला अडचणीचे ठरत आहेत.

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प विरोधात शिवसेना ठाकरे गट स्थानिकांच्या पाठीशी; जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलं निवेदन

साई- डोंगर-पाली या भागातील आदिवासी कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून येथील जमिनीवर शेती करत आहेत. वनविभागाकडून मिळालेल्या जमिनीमध्ये हे आदिवासी लोक विविध पिके घेतात आणि काही ठिकाणी आंबा लागवडही केली आहे. मात्र,अलीकडे टोरेन्ट पॉवर कंपनीने या परिसरात प्रवेश करून कोणतीही स्पष्टता न देता ‘सॉईल टेस्टिंगचे नावाखाली’ मोठी यंत्रसामग्रीद्वारे कामे सुरू केली आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांना उद्धट उत्तरे मिळाली असून ही जमीन ग्रामस्थांची नसून कंपनीची असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आदिवासींचा आरोप आहे की, कंपनी प्रशासनाने जबरदस्तीने त्यांच्या गरीब आदिवासींच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला असून, जंगलातील औषधी वनस्पती आणि रोजगाराचे साधन नष्ट होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न होत आहेत. स्थानिक पातळीवर साई डोंगर येथे होत असलेली 3000 मेगा वॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असलेली जलविद्युत प्रकल्पाचे परिसरात असलेली जमीन शेतकऱ्यांची आहे. ती जमीन स्थानिकांनी देण्याबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नाही. त्याचवेळी तेथे जंगलात तीन ठिकाणी लोकवस्ती असून त्या लोकवस्तीमधील घराची आजुबाजूची जमीन आदिवासी लोकांचे नावे आहे. पण त्या जमिनीमध्ये टोरंट जलविद्युत प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी यांची घुसघोरी सुरू आहे.

तेथे शासनाच्या निधी मधून रस्ते बनवले आहेत,तेथील अनेक घरांना घरकुल योजनेच्या निधीचा लाभ देण्यात आला आहे. तेथे असलेल्या शाळा, अंगणवाडी तसेच समाजमंदिर अशा सरकारी वास्तू यांना सरकारी निधी खर्च करून बांधकाम झाले आहे. तेथील रस्ते शासनाने निधी खर्च करून केले आहेत आणि असे असताना त्या ठिकाणी माती परिक्षण करण्याचे काम करण्याची परवानगी स्थानिक ग्रामपंचायत कडून घेणे आवश्यक आहे. मात्र ग्रामपंचायतीकडे त्याबाबत कोणताही पत्र व्यवहार नाही आणि त्यामुळे ग्रामपंचायतीने विरोध केला आहे. ग्रामपंचायतकडून प्रकल्पाला विरोध करणारे ठराव घेतले असताना देखील प्रशासनाच्या मदतीने सुरू असलेली घुसखोरी थांबवावी अशी मागणी आदिवासी लोक करीत आहेत.

Karjat News : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कर्जत नगरपरिषदेत आमचीच सत्ता; उबाठा गटाकडून आढावा बैठकीत दावा

ग्रामपंचायतीचे म्हणणे
ग्रामपंचायतीने केलेले ठराव देखील टोरंट कंपनीच्या लोकांना मान्य नाहीत काय? असा सवाल सरपंच संजना बाळकृष्ण पवार यांनी उपस्थित केला आहे.तर रायगड जिल्हाधिकारी यांनी आमच्या ठरावांना किंमत नसेल तर मग आम्हाला जनतेतून निवडून तरी कशाला दिले असा सवाल देखील सरपंच पवार यांनी उपस्थित केला आहे.

शंकर इका कातकरी, स्थानिक
वन जमिनीमधील दळी भूखंड आमच्या मालकीचे झाले आहेत.जंगलातील जंगली मेवा गोळा करून आम्ही विकतो आणि त्यातून आमची घरात दोन वेळचे अन्न मिळते.असे असताना आमची रोजीरोटी हातातून हिसकावून घेण्याचे काम टोरंट कंपनी करीत आहे.आम्ही आमची जमीन दिलेली नसताना आणि आमच्या मालकीची जमीन झालेली असताना पूर्वापार वहिवाट असलेल्या जमिनीमध्ये आम्हाला न विचारता घुसतात हे योग्य आहे काय? असा सवाल विचारला जात आहे.

Web Title: Karjat news villagers object to torrent gram panchayat directs to go back on project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.