Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjay Munde- Karuna Munde: ‘धनंजय मुंडेंकडे एवढे डोके नाही तर…’; कोर्टाच्या निर्णयावर करुणा मुंडेंची प्रतिक्रिया

धनंजय मुंडे यांनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध वरच्या कोर्टात धाव घेतली होती. त्यावर तीन ते चआर सुनावणी पार पडल्या. दरम्यान अखेरच्या सुनावणीमध्ये कोर्टाने मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 05, 2025 | 09:34 PM
Dhananjay Munde- Karuna Munde: 'मुंडेंकडे एवढे डोके नाही तर...'; कोर्टाच्या निर्णयावर करुणा मुंडेंची प्रतिक्रिया

Dhananjay Munde- Karuna Munde: 'मुंडेंकडे एवढे डोके नाही तर...'; कोर्टाच्या निर्णयावर करुणा मुंडेंची प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी आवाज उठवला आहे. दरम्यान वांद्रे कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना दर महिना 2 लाखांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज अखेरची सुनावणी पार पडली. माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा दणका दिला आहे. कोर्टाने मुंडे यांची याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यावर आता करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझगाव कोर्टाने दिलेल्या निकालावर बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, ‘मला न्याय मिळाला. त्यासाठी मी न्यायालयाचे आभार मानते. आज सत्याचा विजय झाला आहे. महिलांसाठी ही एक आदर्श अशा स्वरूपाची केस आहे. माझ्यासारख्या एका साधारण महिलेने मंत्र्याला हरवले आहे. मीच धनंजय मुंडे यांची खरी पत्नी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.’

पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, ‘करुणा मुंडेला प्रेमात अडकवून लग्न केल्यास लाखों रुपये देण्याचे कारस्थान सध्या रचले जात आहे. धनंजय मुंडे यांची गॅंग हे करत आहे. धनंजय मुंडेंकडे एवढे डोके नाही. धनंजय मुंडे विरुद्ध बोलू नकोस नाहीतर तुझ्या मुलीला उचलून घेऊन जाऊ अशा स्वरूपाच्या धमक्या प्राप्त होत आहेत. ‘

कोर्टात काय झाले?

वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी माझगाव कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज अखेरची सुनावणी पार पडली. दरम्यान माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळली आहे, माझगाव कोर्टाने वांद्रे कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. दरम्यान धनंजय मुंडे हे माझगांव कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडून करुणा मुंडे या पोटगीची रक्कम वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.

Dhananjay Munde- Karuna Munde: धनंजय मुंडेंना मोठा धक्का; कोर्टाने पोटगी निर्णयात फेटाळली आव्हान याचिका

धनंजय मुंडे यांनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध वरच्या कोर्टात धाव घेतली होती. त्यावर तीन ते चआर सुनावणी पार पडल्या. दरम्यान अखेरच्या सुनावणीमध्ये कोर्टाने मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळली आहे. त्यामुळे वांद्रे कोर्टाचा करुणा मुंडे यांना महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश कायम ठेवला आहे.

 

Web Title: Karuna munde sharma first reaction about mazgaon court decision dhananjay munde news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 09:34 PM

Topics:  

  • crime news
  • Dhnanjay Munde
  • karuna munde

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
1

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
3

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
4

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.