माझगाव कोर्टाचा धनंजय मुंडे यांना धक्का (फोटो - सोशल मिडिया )
मुंबई: राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी आवाज उठवला आहे. दरम्यान वांद्रे कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना दर महिना 2 लाखांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज अखेरची सुनावणी पार पडली. माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा दणका दिला आहे. कोर्टाने मुंडे यांची याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी माझगाव कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज अखेरची सुनावणी पार पडली. दरम्यान माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळली आहे, माझगाव कोर्टाने वांद्रे कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे.
दरम्यान धनंजय मुंडे हे माझगांव कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडून करुणा मुंडे या पोटगीची रक्कम वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे यांनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध वरच्या कोर्टात धाव घेतली होती. त्यावर तीन ते चआर सुयनावणी पार पडल्या. दरम्यान अखेरच्या सुनावणीमध्ये कोर्टाने मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळली आहे. त्यामुळे वांद्रे कोर्टाचा करुणा मुंडे यांना महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश कायम ठेवला आहे.
करुणा मुंडेना दरमहा एवढी पोटगी
करुणा मुंडे यांनी दरमहा 15 लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने दिलासा दिल्यानंतर करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती.त्यानंतर मुंडे यांनी माझगांव कोर्टात धाव घेतली.
धनंजय मुंडे यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. घरगुती हिंसाचाराचे आरोप करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंसाचाराची केस दाखल केली होती. यामध्ये कोर्टाने धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवले आहे. करुणा मुंडे यांचे आरोप कोर्टाने स्वीकारले आहेत.