Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्ह्यात खंडाळ्याचा डंका; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमध्ये विंग ग्रामपंचायत प्रथम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान स्पर्धेत तालुक्यातील विंग, हरिपूर, वाघोशी या गावांनी उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण तालुक्याची मान उंचावली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 24, 2026 | 11:22 AM
सातारा जिल्ह्यात खंडाळ्याचा डंका; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमध्ये विंग ग्रामपंचायत प्रथम

सातारा जिल्ह्यात खंडाळ्याचा डंका; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमध्ये विंग ग्रामपंचायत प्रथम

Follow Us
Follow Us:

खंडाळा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान स्पर्धेमध्ये खंडाळा तालुक्यातील विंग ग्रामपंचायत प्रथम, हरिपूर ग्रामपंचायत व्दितीय, तर वाघोशी ग्रामपंचायतीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. सातारा जिल्ह्यात खंडाळ्याचा डंका वाजत असून, ही तिन्ही गावे जिल्हास्तरीय तपासणीसाठी सज्ज झाली आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान स्पर्धेत तालुक्यातील विंग, हरिपूर, वाघोशी या गावांनी उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण तालुक्याची मान उंचावली आहे. या स्पर्धेत विंग ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत १५ लाखांच्या पारितोषिकावर नाव कोरले, तर हरिपूर ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवत १२ लाख तर वाघोशी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवत ८ लाखाचे बक्षिस पटकावले. या तिन्ही गावांची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

खंडाळा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग घेतला होता. गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावांनी लोकसहभाग, स्वच्छता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि ग्रामविकासाच्या विविध संकल्पनांवर प्रभावी कामे उभी केली. पंधरा दिवसांपूर्वी पालघर येथील गटविकास अधिकारी पारस्कर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गावांची पाहणी करून गुणांकन केले होते. त्यानुसार विंग, हरिपूर, वाघोशी या गावांनी बाजी मारली.

विंग गावाने विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि विकासात्मक कामांच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवत तालुक्याचा मान उंचावली. गावाच्या एकजुटीने आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीने परीक्षकांवर छाप पाडली.

दरम्यान, पूर्वी छोटी वाडी म्हणून ओळख असलेल्या हरिपूर गावानेही विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या नेतृत्वाखाली गावाने विकासाचा नवा इतिहास घडवला. तब्बल ५६ वर्षांची बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा जपणाऱ्या हरिपूरने या गावाने लोकसहभाग, ग्रामएकजूट आणि कल्पक उपक्रमांच्या जोरावर द्वितीय क्रमांक तर वाघोशी ग्रामपंचायतीनेही विकासकामांमध्ये सातत्य राखत तृतीय क्रमांक मिळवला. ग्रामस्थांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे वाघोशी गावाने तालुक्याच्या यशात मोलाचा वाटा उचलत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

तालुक्यातील विंग, हरिपूर, वाघोशी ही तिन्ही गावे जिल्हास्तरीय तपासणीसाठी सज्ज झाली असून, त्यांच्या यशामुळे खंडाळा तालुक्याचा सातारा जिल्ह्यात डंका वाजला आहे.त्यामुळे तिन्ही गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

“आरक्षण गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही,” ओबीसी क्रिमी लेयर मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

Web Title: Khandala shines in satara district wing gram panchayat secures first place in the chief ministers samruddha panchayat campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • khandala news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
1

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
2

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
3

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
4

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.