Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार व्हायचंय? फॉर्मसाठी द्यावे लागणार ‘इतके’ पैसे

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीच्या तयारीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. पक्षाचं मजबूत संघटन आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2024 | 02:52 PM
शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार व्हायचंय? फॉर्मसाठी द्यावे लागणार ‘इतके’ पैसे
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीच्या तयारीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. पक्षाचं मजबूत संघटन आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना हा अर्ज पैसे देऊन घ्यावा लागणार आहे. खुल्या प्रवर्गातल्या उमेदवाराला 10 हजार रुपये तर इतर प्रवर्गातल्या उमेदवाराला अर्ज घेण्यासाठी 5 हजार रुपये द्यावे लागणार आहेत.

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर इथे हे अर्ज उपलब्ध आहेत. 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज दिलेल्या वेळेत जमा करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात येत आहे.

काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे

लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीला मोठा दणका देत घवघवीत यश मिळवलं. अशातच आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना रंगणार आहे. अशातच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं अंतर्गत सर्व्हे केला आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून आला आहे.

काँग्रेस पक्षानं केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेसचं मोठा पक्ष राहणार आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसला 85 जागा, शरद पवार गटाला 55 ते 60 जागा तर ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसचा हा सर्व्हे आहे की, उद्धव ठाकरेंना इशारा आहे? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळातही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत.

काँग्रेसच्या सर्व्हेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

काँग्रेस : 85 जागा
भाजप : 55
राष्ट्रवादी शरद पवार गट : 55 ते 60
शिवसेना : 24
राष्ट्रवादी अजित पवार गट : 8 ते 9
शिवसेना उद्दव ठाकरे गट : 32 ते 35

Web Title: Know how much money does aspirants have to pay to become mla from ncp sharad pawar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • election 2024
  • maharashtra
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

MHADA lottery : घराचे स्वप्न साकार होणार! म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार लॉटरी
1

MHADA lottery : घराचे स्वप्न साकार होणार! म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार लॉटरी

महाभोंडला अन् भव्य लकी ड्रॅा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; साळेगावकरांच्या वतीने हजारो महिलांना बक्षिसांचे वाटप
2

महाभोंडला अन् भव्य लकी ड्रॅा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; साळेगावकरांच्या वतीने हजारो महिलांना बक्षिसांचे वाटप

World Post Day 2025 : ‘पोस्टमन’ बनला डिजिटल दूत; वाढत्या तंत्रज्ञानामुळे टपाल खातं बदलतंय
3

World Post Day 2025 : ‘पोस्टमन’ बनला डिजिटल दूत; वाढत्या तंत्रज्ञानामुळे टपाल खातं बदलतंय

खासगीकरणाच्या विरोधात महावितरण कर्मचारी संपावर! तीनही वीज कंपन्याचा डोलारा हा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अंगाशी येणार
4

खासगीकरणाच्या विरोधात महावितरण कर्मचारी संपावर! तीनही वीज कंपन्याचा डोलारा हा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अंगाशी येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.