महिन्यातील प्रत्येक रविवारी मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतण्यात येतो. मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे.उपनगरीय रेल्वे मार्गाच्या सिग्नल दुरुस्तीच्या कामासाठी आणि रेल्वे रुळाच्या कामासाठी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धीम्या वर तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी- नेरुळ अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या माहीम ते अंधेरी अप- डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.त्यामुळे रविवारच्या दिवशी घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घरा बाहेर पडा.
मध्य रेल्वे
रविवारी मध्ये रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावर तांत्रिक कामानिमित्त आणि रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या मेगाब्लॉक दरम्यान, सीएसएमटीवरून सुटणाऱ्या गाड्या धीम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड या स्थानकांवर डाउन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. यामुळे शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि त्यानंतर डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच ठाण्यावरून सुटणाऱ्या गाड्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंडवरून अप जलद मार्गावर वळवली जाईल. तर पुढे त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकांवर थांबल्यानंतर धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवा आपल्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिट उशिराने होणार आहे.
ट्रान्स-हार्बर
मेगाब्लॉकमुळे ठाणे-वाशी/नेरळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत ठाणेवरून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम ते अंधेरी या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-बांद्रा,गोरेगाव दरम्यानची लोकल वाहतूक पुर्णपणे बंद राहील. तर चर्चगेट ते गोरेगाव लोकल सेवा देखील बंद ठेवली जाणार आहे.