Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या यादीतून कोल्हापूर-हातकणंगले वगळले; धनंजय महाडिकांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

भाजपकडून राज्यातील २३ लोकसभा मतदारसंघातील निरीक्षक निवडीची यादी जाहीर केली आहे. या निरीक्षक निवड यादीत कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची निवड करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 29, 2024 | 11:23 AM
भाजपच्या यादीतून कोल्हापूर-हातकणंगले वगळले; धनंजय महाडिकांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची दाट शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यातील २३ लोकसभा मतदारसंघातील निरीक्षक निवडीची यादी जाहीर केली आहे. या निरीक्षक निवड यादीत कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची उत्तर मध्य-मुंबई या ठिकाणी निरीक्षक म्हणून निवड केली आहे.

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राज्यातील २३ मतदार संघातील निरीक्षक निवड यादीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा या निवडणूक निरीक्षक यादीत समावेश नाही. निवड यादीनंतर या दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे चित्र आता गडद झाले आहे.

भाजपकडून दोन पैकी एका मतदारसंघावर दावा केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांमध्ये अस्वस्थता होती. मात्र या निवड यादीमुळे काही अंशी विद्यमान खासदारांना दिलासा मिळाला आहे. भाजप निवडणूक निरीक्षकांची संपूर्ण यादी जाहीर केली असून, यामध्ये कोल्हापूर वगळून अन्य मतदार संघाचा समावेश आहे. उत्तर मध्य मुंबईची जबाबदारी धनंजय महाडिक, राजेश पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

शिंदे गटाकडेच मतदारसंघ राहणार

गेल्या पंधरा दिवसात शिवसेना शिंदे गटाचे महा अधिवेशन कोल्हापुरात पार पडले होते. या अधिवेशनात लोकसभेच्या जागा शिंदे गटाकडेच राहतील असे संकेत यातून मिळाले होते. त्यामुळे काही अंशी तरी सद्यस्थितीत हे दोन्ही मतदारसंघ शिंदे गटाकडेच राहतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Kolhapur hatkangle dropped from bjps list mahadika got this big responsibility nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 11:23 AM

Topics:  

  • BJP
  • Dhananjay Mahadik
  • Election
  • kolhapur
  • lok sabha
  • maharashtra
  • shivsena

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.