Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Balumama Devasthan Scam:  आणखी एका मंदिरातील आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश; बाळूमामा देवस्थानातील 60.75 कोटींच्या गैरव्यवहार उघड

गुन्हा दाखल होताच या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आर्थिक व्यवहार, निधीचा वापर, कंत्राटे आणि देवस्थानाच्या आर्थिक नोंदींची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 03, 2026 | 04:15 PM
Balumama Devasthan 60 Crore Fraud, Kolhapur Crime News

Balumama Devasthan 60 Crore Fraud, Kolhapur Crime News

Follow Us
Follow Us:
  • आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान समितीमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख 28 हजार रुपयांच्या कथित गैरव्यवहार
  • देवस्थानातील ६० कोटींच्या घोटाळ्यामुळे वारकरी संप्रदायात व भाविकांमध्ये प्रचंड संताप
  • कोल्हापूर पोलिसांच्या ईओडब्ल्यूकडून तपास सुरू
Kolhapur News:अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा तापला असतानाच आता महाराष्ट्रातील एका मंदिरातील आर्थिक घोटाळ्याचे प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान समितीमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख 28 हजार रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणी उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

रागिणी खडके फरार असल्याचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हा प्रमुख निलोत्पल यांनी बाळूमामा देवस्थान समितीत 60 कोटी 75 लाख 28 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर उपनिबंधक रागिणी खडके या फरार असून तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. या कथित गैरव्यवहारात त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. मात्र, या आरोपांवर संबंधितांनी अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

Pankaja Munde On Political Exit: कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावसं वाटतं..; पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

कोणाविरोधात गुन्हा?

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी खडके, सचिव रावसाहेब वीराप्पा खोतकरी (रा. भडगाव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) तसेच संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थ यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, संबंधितांनी संगनमताने कट रचून विश्वासाचा गैरफायदा घेत फसवणूक केली आणि आर्थिक गैरव्यवहार केले, असा आरोप करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास

गुन्हा दाखल होताच या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आर्थिक व्यवहार, निधीचा वापर, कंत्राटे आणि देवस्थानाच्या आर्थिक नोंदींची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कथित गैरव्यवहारामुळे राज्यातील धार्मिक संस्थांच्या आर्थिक कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तपासातून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Abhijeet Dipke Challenge To PM Modi: पंतप्रधानांनी आधी पदवी जाहीर करावी; अभिजित दिपकेंचे पंतप्रधानांना थेट आव्हान

Web Title: Kolhapur news balumama devasthan admapur 60 crore financial scam eow inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • crime news
  • Financial Scam
  • kolhapur news
  • ram mandir news

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.