
ऑनलाईन कामामध्ये युडीएसइ, युडीएसइ पोर्टलवर आधार वैधता, शाळा सोडून गेलेले व सतत गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना ड्रॉप बॉक्समध्ये टाकून ड्रॉप बॉक्स क्लियर करणे, बाहा शाळेतील मुले इम्पोर्ट करणे, उच्च माध्यमिक वर्गाचे सरल पोर्टलवर विद्याथ्यांची माहिती विषय निहाय भरणे, निपूण महाराष्ट्र अंतर्गत अप्रगत विद्याथ्यांचा शोच घेणे, शाळेची पूर्ण माहिती भरणे, ईको क्लबवर माहिती भरणे, एसएचपीआर वर शाळा सुरक्षितता विषयी माहिती भरणे, एक पेड मॉ के नाम, लोकेशन सह शाळा मंधिग, १०० कोटी वृक्ष लागवड, एनएमएमएस तसेव वार-पाच प्रकारच्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य, शिक्षक प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी पोर्टल भरणे, नॅशनल विल्ड कॉन २०२५ वर रजिस्ट्रेशन, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क भरणे, आनंददायी शनिवार उपक्रम, ट्रेनिंग मॅनेजमेंट सिस्टीम, उपक्रम, चर्चा प्रज्ञावंताशी उपक्रम, टेस्ट अभ्यासक्रम, तमन्ना सायकोमेट्रिक टेस्ट, अटल टिकरोग लॅब आयसीटी लंब सायन्स मॅथ्स किट रोबोटिक किट जायी पिटारा, स्मार्ट क्लासरूम्, प्रश्नपेढी, शालेय पोषण आहार, उल्हास अॅप, पालक सभा दीक्षा ऍप, शासनाचे विधी योजना अशा अनेक ऑनलाइनच्या काही अंशी निरर्थक कामांमध्ये शिक्षक व्यस्त असतात, परिणामी विदयाथ्यांच्या अभ्यासाकडे शिक्षकाना लक्ष देता येत नाही.
जनगणना नवीन जबाबदारी
शिक्षकांना इतर ऑनलाईन कामाबरोबर आता जनगणनेचे काम सोपवले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत है शिक्षकांना नवीन जनगणना करावी लागणार आहे. राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे यामध्ये कुचराई करून चालणार नाही, जनगणनेचे काम केले नाही तर सरकार शिक्षकांवर कारवाईचा दंडुका उचलू शकते. त्यामुळे दररोजच्या ऑनलाईन कामामध्ये नवीन जनगणना शिक्षकांसाठी नव्याचे काम आहे.
शिक्षक शाळांत येताच धडकते व्हॉट्सपवर नवी लिंक
विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक हे दुसऱ्या दिवशी काय शिकवायचे याचा गृहपाठ करून येत होते. पूर्वतयारी करून येत होते. आता अध्यापनापेक्षा सरकारचा कोणता नवीन आदेश येईल, याकडेच शिक्षकांचे जास्त लक्ष लागले आहे. शिक्षक शाळांमध्ये येताच व्हॉट्सअपवर नवी लिंक धडकते. ती लगेच भरली नाही तर वरून फोन येतो. विद्यार्थी वर्गात बसलेले, पण शिक्षक मात्र स्क्रीनवर अडकलेले, सकाळची एक मागणी पूर्ण केली की दुपारी नदी मागणी होते. शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी वेळच देता येत नाही. दुसरीकडे गुणवत्ता पूर्ण शिक्षण नसल्याचा ठपका ठेवला जातो.