Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : एका पाऊल निरोगी आरोग्याकडे ; मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना 16कोटींची मदत

कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  1 मे रोजी कार्यान्वित झालेला मुख्यमंत्री सहायता निधी जिल्हा समन्वय कक्ष अत्यंत अल्पावधीत रुग्णांसाठी मोठा आधार बनला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 28, 2025 | 06:15 PM
Kolhapur News :  एका पाऊल निरोगी आरोग्याकडे ; मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना 16कोटींची मदत
Follow Us
Close
Follow Us:
  • एका पाऊल निरोगी आरोग्याकडे
  • मुख्यमंत्री सहायता निधीतून 2197 रुग्णांना 16कोटींची मदत
कोल्हापूर : कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  1 मे रोजी कार्यान्वित झालेला मुख्यमंत्री सहायता निधी जिल्हा समन्वय कक्ष अत्यंत अल्पावधीत रुग्णांसाठी मोठा आधार बनला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या रुग्णांना उपचारांसाठी मदत मिळवून देणे, रुग्णालयांशी समन्वय साधून आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देणे, तसेच निधी मंजुरीची प्रक्रिया गतिमान करणे, यासाठी या कक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Kolhapur News : निवडणुकीत स्थानिक पातळीवरच भूमिका घ्या; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा निर्णय

कक्ष सुरू झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण 2 हजार 197 रुग्णांना 16 कोटी 26 लाख 16 हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून वितरित केली आहे. कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडाचे विकार, अपघातातील गंभीर दुखापती, तसेच इतर महागडे उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांना या निधीचा थेट फायदा झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. समन्वय कक्षामुळे जिल्ह्यातील गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी प्रत्यक्षात अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुढील काळातही हा उपक्रम अधिक व्याप्ती वाढवून कार्यरत राहील, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

कक्षाच्या देणगी संकलनातून तब्बल 12 लाख 3हजार रुपयांचे संकलन

रुग्णांना निधी वितरणाबरोबरच कक्षाने देणगी संकलनातही पुढाकार घेतला आहे. विविध सामाजिक संस्था, नागरिक, उद्योगसमूहांकडून मिळालेल्या मदतीतून 120लाख 3 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीकडे जमा करण्यात आले आहेत. या रकमेमुळे अधिक रुग्णांना मदत पुरवणे शक्य झाले आहे. पूर्वी निधी मिळवण्यासाठी रुग्णांना अनेक पायऱ्यांतून जावे लागायचे. कागदपत्रांची पडताळणी, रुग्णालयांशी संवाद, उपचार खर्चाचे अंदाजपत्रक, जिल्हास्तरवरील मंजुरी या सर्व प्रक्रियांना विलंब होत असे. मात्र समन्वय कक्ष उभारल्यानंतर सर्व कामे एकाच खिडकीतून (वन-स्टॉप सिस्टीम) पार पडत असल्याने उपचार सहाय्य प्रक्रिया जलद झाली आहे.

रुग्ण व कुटुंबीयांकडून समाधान

अनेक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयानी कक्षाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. वेळेत मिळालेल्या सहाय्यामुळे अनेकांना महत्त्वाचे उपचार घेणे शक्य झाले आहे. जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांशी समन्वयही अधिक सुगम झाला असून, अधिकारीही तत्परतेने कागदपत्रांची पूर्तता करून देत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Kolhapur News : इचलकरंजीत मतदारयादीत सावळा गोंधळ; नेमकं प्रकरण आहे तरी काय ?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुख्यमंत्री सहायता निधी जिल्हा समन्वय कक्ष म्हणजे काय?

    Ans: मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात तयार केलेला वन-स्टॉप (One-Stop) कक्ष आहे. येथे कागदपत्रे, रुग्णालयाशी समन्वय, तसेच निधी मंजुरीची प्रक्रिया जलद केली जाते.

  • Que: आतापर्यंत किती रुग्णांना मदत मिळाली आहे?

    Ans: कक्ष सुरू झाल्यापासून 2,197 रुग्णांना एकूण 16 कोटी 26 लाख 16 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.

  • Que: निधी मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

    Ans: साधारणपणे– रुग्णाचे आधारकार्ड डॉक्टरांकडून दिलेले प्रमाणपत्र उपचार खर्चाचे अंदाजपत्रक उत्पन्न प्रमाणपत्र (तपशील रुग्णालय/कक्षानुसार बदलू शकतात.)

Web Title: 16 crores assistance to 2197 patients from chief ministers relief fund in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Maharashtra CM
  • Marathi News

संबंधित बातम्या

Latur Election : उद्गीर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे संजय बनसोडेंचे आश्वासन
1

Latur Election : उद्गीर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे संजय बनसोडेंचे आश्वासन

Pune News : Phule Wada स्मारक व्यवस्थापनाकडे देण्याला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध
2

Pune News : Phule Wada स्मारक व्यवस्थापनाकडे देण्याला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

Chandrapur News: प्रचार करताना उमदेवारांची दमछाक, १२७५ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात
3

Chandrapur News: प्रचार करताना उमदेवारांची दमछाक, १२७५ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात

Raigad News: डिजिटल यंत्रणेने वाढवले रुग्णांचं टेंशन, ‘आभा’ अ‍ॅपमुळे संतापले नागरिक
4

Raigad News: डिजिटल यंत्रणेने वाढवले रुग्णांचं टेंशन, ‘आभा’ अ‍ॅपमुळे संतापले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.