Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: डिजिटल यंत्रणेने वाढवले रुग्णांचं टेंशन, ‘आभा’ अ‍ॅपमुळे संतापले नागरिक

मोबाईलवरून केस पेपर नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत करत असल्याचा आरोप केला जात आहे. टोकन मिळविण्यासाठी नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 28, 2025 | 03:18 PM
Raigad News: डिजिटल यंत्रणेने वाढवले रुग्णांचं टेंशन, 'आभा' अ‍ॅपमुळे संतापले नागरिक

Raigad News: डिजिटल यंत्रणेने वाढवले रुग्णांचं टेंशन, 'आभा' अ‍ॅपमुळे संतापले नागरिक

Follow Us
Follow Us:
  • आभामुळे रुग्ण अवस्था कोलमडली
  • घरबसल्या केस पेपरची सुविधा
  • प्रत्यक्षात टोकनसाठीच लांबलचक रांगा
अलीबागमध्ये आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत रुग्णांना मोबाईलवरून केस पेपर नोंदणीची ‘हायटेक’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी हीच ऑनलाईन प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे चटके रुग्णालयांमध्ये रोज जाणवू लागले आहेत. मोबाईलवर ‘आभा’ अ‍ॅप डाउनलोड करा, मोबाईल नंबरने रजिस्टर करा, क्यूआर कोड स्कॅन करा, टोकन मिळवा आणि नंतर पुन्हा रुग्णालयात जाऊन तेच टोकन दाखवून केस पेपर घ्या, एवढी क्लिष्ट प्रक्रिया रुग्णांसाठी ‘सुविधा’ नसून सरळसरळ त्रासदायक ‘यंत्रणा’ ठरत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई तीव्र! शहराचे पाणीपुरवठा वेळापत्रक पुन्हा बिघडले; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

सुविधा तर डिजिटल, पण प्रत्यक्षात रांगा मात्र दुप्पट !

जिल्हा रुग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या खिडक्यांची व्यवस्था असूनही नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे, डिजिटल प्रक्रियेने ही रांग कमी होईल अशी अपेक्षा होती, परंतु टोकन मिळविण्यासाठीच आता नवीन रांग तयार झाली आहे. यामुळे रुग्णांना आणखी त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयातील आभा कक्षात क्यूआर स्कॅन करण्यासाठी उसळणारी गर्दी पाहून अनेकजण संतापून म्हणत आहेत, जुनी पद्धत बरी होती.  (फोटो सौजन्य – X) 

‘डिजिटल’ नावाखाली फक्त भूलथापाच

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिलांचे हाल अधिकच वाढले आहेत. केस पेपर मिळवण्यासाठी आधी ऑनलाईन कसरत करा आणि नंतर पुन्हा रांगेत उभे राहा. डिजिटल सुविधा म्हणून दिलेली ही अडचण आम्हाला नको, असा सर्वसामान्यांचा सूर आहे. काही रुग्ण ऑनलाईन टोकन मिळविण्यासाठीच रुग्णालयाच्या आवारात तासंतास फिरत राहतात. मोबाईलमध्ये कमी नेटवर्क, अ‍ॅपचा उशीर, स्कॅनिंगमध्ये अडचणी यामुळे रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

प्रक्रिया सुधारू; आरोग्य विभागाचे आश्वासन

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी सांगितले, आभा हेल्थ मिशन अंतर्गत ऑनलाईन प्रक्रिया राबवली असून, कुठे विलंब होत असल्यास प्रक्रिया अधिक सुलभकरण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, मार्गदर्शनासाठी कर्मचारी नेमले आहेत.

Mumbai Crime: ‘कमला पसंद’ मालकाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल! सुसाईड नोट सापडली; कारण काय?

डिजिटल हेल्थ मिशनची कास धरली, पण रुग्ण मात्र मागेच

ऑनलाईन सुविधा आणण्यामागील उद्देश रुग्णांना रांगेपासून मुक्त करणे हा होता, परंतु प्रत्यक्षात टोकन, स्कॅन, रजिस्ट्रेशन आणि पुन्हा रांग अशी ‘दुहेरी’ कसरत रुग्णांकडून करवून घेतली जात आहे. डिजिटल वळणाचे स्वागत असूनही ही प्रक्रिया तत्काळ सुलभ न केल्यास रुग्णांसाठी सुरू असलेली ही रोजची धावपळ आरोग्य व्यवस्थेवरील नाराजी अधिक वाढविण्याची शक्यता आहे.

Web Title: Raigad news digital system increases patient troubles citizens angry over abha app issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Alibag
  • Marathi News
  • raigad

संबंधित बातम्या

Life Insurance Guide: केवळ गरजेचा नाही तर आर्थिक सुरक्षाकवच! वय आणि गरजेनुसार कसा असावा तुमचा जीवन विमा? पाहा सविस्तर
1

Life Insurance Guide: केवळ गरजेचा नाही तर आर्थिक सुरक्षाकवच! वय आणि गरजेनुसार कसा असावा तुमचा जीवन विमा? पाहा सविस्तर

Mumbai Real Estate: मुंबईत घरांची रेकॉर्डब्रेक खरेदी! मे महिन्यात 14 वर्षांतील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी
2

Mumbai Real Estate: मुंबईत घरांची रेकॉर्डब्रेक खरेदी! मे महिन्यात 14 वर्षांतील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी

कॅनकिड्स किड्सकॅनच्या ‘सायकल फॉर गोल्ड’ मोहिम, बाल कर्करोग रुग्णांसाठी ₹3.1 कोटींच्या निधीची उभारणी
3

कॅनकिड्स किड्सकॅनच्या ‘सायकल फॉर गोल्ड’ मोहिम, बाल कर्करोग रुग्णांसाठी ₹3.1 कोटींच्या निधीची उभारणी

FIFA World Cup 2026 च्या थेट प्रक्षेपणाची डील फायनल; ‘या’ मीडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 6% ची उसळी
4

FIFA World Cup 2026 च्या थेट प्रक्षेपणाची डील फायनल; ‘या’ मीडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 6% ची उसळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.