सद्य परिस्थितीत नागरिकांनी हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दिलेला कालावधी अत्यंत मर्यादित आहे. शहरातील रहिवासी, कामगारवर्ग व ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक कागदपत्रे गोळा करून हरकती नोंदविण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. काही व्यक्तींना तर सूचनावलीबाबतची माहितीही वेळेत मिळालेली नाही. त्यामुळे मतदार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता व अचूकता राखण्यासाठी मुदतवाढ अत्यावश्यक असल्याचे दाभोळे यांनी नमूद केले आहे. मतदारसंख्येत मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने याद्यांची तपासणी करण्यासाठी अधिक वेळ देणे गरजेचे आहे.
विधानसभा मतदार यादीतील अद्ययावत सुधारणा अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याने नागरिकांची नावे अचूकपणे तपासणे कठीण झाले आहे. परिणामी, योग्य व पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची किंवा चुकीने समाविष्ट होण्याची शक्यता वाढली आहे. किमान १५ ते २० दिवस तरी प्रारूप मतदार यादीतील हरकती व सूचना सादर करण्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली. आहे. मुदतवाढ दिल्यास नागरिकांचा त्रास कमी होईल तसेच निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुटसुटीत होईल, असे दाभोळे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, हे निवेदन निवडणूक निवडणूक अधिकारी तसेच इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनालाही पाठविण्यात आले आहे. या मागणीवर नागरिकांमध्ये व्यापक पाठींबा उमटताना दिसत आहे.
Ans: प्रारूप याद्यांमध्ये अनेक मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून इतर प्रभागात स्थलांतरित झालेली दिसत आहेत. तसेच प्रभागनिहाय विभागणीमध्ये अनियमितता असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
Ans: दिलेला कालावधी अत्यंत मर्यादित असल्याने कामगार, विद्यार्थी, वरिष्ठ नागरिक आणि व्यस्त नागरिकांना नाव, पत्ता, दस्तऐवज तपासून हरकती दाखल करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही.
Ans: प्रभागनिहाय विभागणीतील अनियमितता अनेक नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागात दिसणे माहिती वेळेत मिळत नाही त्रुटी दुरुस्तीसाठी पुरेसा वेळ नसणे हे मुद्दे अधोरिखेित केले आहेत,






