Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील ‘तारा’च्या हालचालींवर प्रशासनाचं बारिक लक्ष; वाघीण शोधतेय हक्काची जागा

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आलेल्या वाघिणीच्या हालचालींवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 09, 2025 | 05:35 PM
Kolhapur : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील ‘तारा’च्या हालचालींवर प्रशासनाचं बारिक लक्ष; वाघीण शोधतेय हक्काची जागा
Follow Us
Follow Us:
  • अतिशय ऐटीत ती पिंजऱ्यातून बाहेर पडली
  • ‘तारा’च्या हालचालींवर प्रशासनाचं बारिक लक्ष
  • वाघीण शोधतेय हक्काची जागा
कोल्हापूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आलेल्या वाघिणीच्या हालचालींवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. १५ दिवसांपूर्वी जंगलात सोडण्यात आलेल्या या वाघिणीच्या हालचाली ‘रेडिओ कॉलर’च्या माध्यमातून सातत्याने नोंदवल्या जात आहे. दरम्यान, ही वाघीण शिकार करत असून स्वतःच्या अधिकारक्षेत्राचा ती शोध घेत आहे.

नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत असे तिचे वर्तन असले तरीही ती पूर्णपणे स्थिरावली असे म्हणण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ‘तारा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीला १५ नोव्हेंबरला सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले. यावेळी ‘चंदा’ असे तिचे नामकरण करण्यात आले होते. सह्याद्रीत आल्यानंतर तिला नियंत्रित पिंजऱ्यात ठेवण्यात आले. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले.

Kolhapur Politics: शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवायला निधी नाही, पण महामार्गासाठी १ लाख कोटी? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

भारतीय वन्यजीव संस्थेचे वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले. दि. 18नोव्हेंबरला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक अधिवासात तिला मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडण्यात आले. मात्र, दोन दिवस ती नियंत्रित पिंजऱ्यातच फिरत होती. दरवाजा उघडा ठेवूनही ती बाहेर गेली नाही. मात्र, दि. २० नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता अतिशय ऐटीत ती पिंजऱ्यातून बाहेर पडली आणि जंगलात निघून गेली.

वाघिणीने नियंत्रित पिंजऱ्यात उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दर्शवल्यामुळे नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन आढळले. गेल्या 15 दिवसात तिची वर्तणूक ही नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत अशीच आहे. यादरम्यान नवीन अधिवासात तिने शिकार देखील केलीआहे आणि या नवीन अधिवासात ती स्वतःचे अधिकारक्षेत्र शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या हालचालीवर व्याघ्रप्रकल्प आणि एकूणच चमू लक्ष ठेवून आहे आणि लवकरच ती या व्याघ्रप्रकल्पात पूर्णपणे स्थिरावेल, असा – विश्वास तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक यांनी व्यक्त केला आहे.

रेडिओ कॉलरच्या आधारावर तिच्या हालचाली सतत नोंदवल्या जात आहेत.सध्या ती सह्याद्रीच्या मुख्य जंगलपट्टीत मुक्तपणे फिरत असली तरी पूर्णपणे स्थिरावली असे घोषित करण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. नव्या अधिवासात स्वतःचे अधिकारक्षेत्र निश्चित करणे, नियमित शिकार आणि नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन हा दीर्घकालीन टप्पा तिला गाठायचा आहे. सध्यातरी तिचे आरोग्य, तिच्या हालचाली आणि नव्या अधिवासात जुळवून घेत असल्याचे दिसून येत असल्याने वनाधिकारी देखील समाधानी आहेत. मात्र, ती पूर्णपणे स्थिरावण्यासाठी पुढील काही आठवडे निर्णायक ठरणार आहेत.

Kolhapur News : शूटिंग रेंज खासगीकरणाला तीव्र विरोध; जिल्हा प्रशासनाविरोधात संताप

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात का आणण्यात आले?

    Ans: सह्याद्री परिसरातील वाघसंख्येत वाढ, जैवविविधतेचा विकास आणि संतुलित वाघ-अधिवास राखण्यासाठी ‘तारा’ला सह्याद्रीत आणण्यात आले. या प्रक्रिया वैज्ञानिक आणि वन्यजीव तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात.

  • Que: वाघिणीवर नियंत्रण आणि निरीक्षण कसं ठेवलं जात आहे?

    Ans: तिच्या गळ्यात रेडिओ कॉलर बसवण्यात आले असून त्याद्वारे तिच्या प्रत्येक हालचालींचा मागोवा वनाधिकारी आणि व्याघ्रप्रकल्पाचे पथक घेत आहे.

  • Que: या स्थलांतराचा वन्यजीव संवर्धनाला काय फायदा?

    Ans: सह्याद्रीतील वाघसंख्येत वाढ परिसंस्थेत आरोग्यदायी संतुलन जनुकीय विविधतेत भर व्याघ्रप्रकल्पाच्या विकासाला चालना या सर्व गोष्टींना या स्थलांतरामुळे मोठा लाभ होतो.

Web Title: Administration closely monitoring the movements of tara tigress in the sahyadri tiger reserve

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • kolhapur
  • Marathi News
  • Tiger Project

संबंधित बातम्या

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?
1

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?

Gold Loan Business : सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई? टाटा, गोदरेज, बिर्ला… समुहांची धडाधड एन्ट्री, नेमका काय प्लॅन?
2

Gold Loan Business : सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई? टाटा, गोदरेज, बिर्ला… समुहांची धडाधड एन्ट्री, नेमका काय प्लॅन?

New FDC Rules: पालकांनो सावधान! बाळाच्या सर्दी-खोकल्यासाठी ‘ही’ औषधं देताय? केंद्राचा मोठा निर्णय
3

New FDC Rules: पालकांनो सावधान! बाळाच्या सर्दी-खोकल्यासाठी ‘ही’ औषधं देताय? केंद्राचा मोठा निर्णय

Buldhana News : बुलढाण्याच्या सौंदर्याला कचऱ्याचा डाग; नागरिक दुषित वातावरणामुळे त्रस्त!
4

Buldhana News : बुलढाण्याच्या सौंदर्याला कचऱ्याचा डाग; नागरिक दुषित वातावरणामुळे त्रस्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.