Kolhapur Politics: शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवायला निधी नाही, पण महामार्गासाठी १ लाख कोटी? राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Jai Anmol Ambani: अनिल अंबानीचा मुलगा जय अनमोलवर FIR दाखल, तब्बल 228 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
राजू शेट्टी म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे, ही अर्थव्यवस्था टिकवून ठेवायची असेल तर केंद्र सरकारने शेती व्यवसायाकडे दुर्लक्षित करून चालणार नाही. राज्यातील शेतकरी अतिवृष्टी, महापूर, अस्मानी व सुल्तानी संकटे यासारख्या नैसर्गिक आपत्तीने खचला गेला आहे.
यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शेतकरी नेते राज्य संघटक घनश्याम चौधरी यांनी शिवसेनेला रामराम ठोकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. या कार्यक्रमास मराठवाडा प्रमुख किशोर ढगे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अमर कदम, कोषाध्यक्ष बापू कारंडे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष नथू पाटील, पवन पटेल यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
8th Pay Commission: 1 जानेवारीपासून लागू होणार 8 वा वेतन आयोग? सरकारने संसदेत दिली पूर्ण माहिती,
राज्यामध्ये दररोज ८ हून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. या अशा काळातही राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास हात आखडता घेत आहे. नागपूरमध्ये राज्याचे अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या विधानभवनात प्रवेश करण्याआधी विधानभवानाच्या पायऱ्यावर माथा टेकून अंर्तमुख होवून राज्यातील आत्महत्या करणारा शेतकरी डोळ्यांसमोर आणावा म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांचे वास्तव लक्षात येईल.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संस्थापक राजू शेट्टी म्हणाले, अदानीच्या हितासाठी जर राज्यामध्ये १ लाख कोटींचा शक्तीपीठ महामार्ग केला जात असेल, तर दररोज ८ शेतकरी व वर्षाला जवळपास ३ हजार आत्महत्या थांबवण्यासाठी राज्याच्या तिजोरीत ३५ हजार कोटी नाहीत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे, नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातील कापूस, ज्वारी, मका, तूर, बाजरी, गहू, हरभरा, ऊस, सोयाबीन, मिरची उत्पादक शेतक-यांचे अर्थकारण कोलमडले आहे, अशी खंतही राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली.






