Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : शेतकऱ्यांप्रति सरकार बेजबाबदार ! राजू शेट्टी यांची टीका; देशातील शेती व्यवसायाची अधोगती झाल्याची खंत

केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेजबाबदार झाल्यानेच देशातील शेती व्यवसायाची अधोगती होत चालली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 09, 2025 | 04:54 PM
Kolhapur News : शेतकऱ्यांप्रति सरकार बेजबाबदार ! राजू शेट्टी यांची टीका; देशातील शेती व्यवसायाची अधोगती झाल्याची खंत
Follow Us
Close
Follow Us:
  • शेतकऱ्यांप्रति सरकार बेजबाबदार !
  • राजू शेट्टी यांची टीका
  • देशातील शेती व्यवसायाची अधोगती झाल्याची खंत
कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेजबाबदार झाल्यानेच देशातील शेती व्यवसायाची अधोगती होत चालली आहे. देशातील मुठभर उद्योगपतींच्या हितासाठी ढीगभर शेतक-यांच्या माथी चुकीच्या धोरणांचा वरवंटा फिरवला जात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली. शहादा (जि. नंदुरबार) येथे घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.राजू शेट्टी म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे, ही अर्थव्यवस्था टिकवून ठेवायची असेल तर केंद्र सरकारने शेती व्यवसायाकडे दुर्लक्षित करून चालणार नाही. राज्यातील शेतकरी अतिवृष्टी, महापूर, अस्मानी व सुल्तानी संकटे यासारख्या नैसर्गिक आपत्तीने खचला गेला आहे.

यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शेतकरी नेते राज्य संघटक घनश्याम चौधरी यांनी शिवसेनेला रामराम ठोकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. या कार्यक्रमास मराठवाडा प्रमुख किशोर ढगे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अमर कदम, कोषाध्यक्ष बापू कारंडे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष नथू पाटील, पवन पटेल यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kolhapur News : शूटिंग रेंज खासगीकरणाला तीव्र विरोध; जिल्हा प्रशासनाविरोधात संताप

मदत करण्यास सरकारचा आखडता हात

राज्यामध्ये दररोज 8 पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. या अशा काळातही राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास हात आखडता घेत आहे. नागपूरमध्ये राज्याचे अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या विधानभवनात प्रवेश करण्याआधी विधानभवानाच्या पायऱ्यावर माथा टेकून अंर्तमुख होवून राज्यातील आत्महत्या करणारा शेतकरी डोळ्यांसमोर आणावा म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांचे वास्तव लक्षात येईल.

शेतकऱ्यांसाठी तिजोरीत पैसे नाहित हे शेतकऱ्यांचे दुर्दैव

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संस्थापक राजू शेट्टी म्हणाले, अदानीच्या हितासाठी जर राज्यामध्ये १ लाख कोटींचा शक्तीपीठ महामार्ग केला जात असेल, तर दररोज 8 शेतकरी व वर्षाला जवळपास 3हजार आत्महत्या थांबवण्यासाठी राज्याच्या तिजोरीत ३५ हजार कोटी नाहीत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे, नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातील कापूस, ज्वारी, मका, तूर, बाजरी, गहू, हरभरा, ऊस, सोयाधीन, मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे, अशी खंतही राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली.

Kolhapur News : जिल्ह्याच्या अर्थकारणाला पशुधनातून मिळतेय गती; प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना बियाणे वाटप

💡

Frequently Asked Questions

  • Que: राजू शेट्टी यांनी सरकारवर कोणती मुख्य टीका केली?

    Ans: राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्याची टीका केली. त्यांच्या मते सरकार उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असून चुकीच्या कृषी धोरणांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो.

  • Que: शेतकरी मेळाव्यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

    Ans: कोरडवाहू शेतीतील अडचणी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, शेतकऱ्यांचे कर्ज, पिकांच्या दरातील घसरण आणि सरकारकडून अपेक्षित मदत यासंबंधी सविस्तर चर्चा झाली.

  • Que: राज्यातील शेतकरी कोणत्या संकटांना तोंड देत आहेत?

    Ans: राज्यात वारंवार अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्ती होत आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून उत्पादन खर्च भरून निघत नाही.

Web Title: Government is irresponsible towards farmers raju shettys criticism regrets the decline of agriculture in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 04:54 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • kolhapur news
  • raju shetty

संबंधित बातम्या

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल
1

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?
2

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन
3

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक
4

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.