Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KMC Elections 2026: एक स्टेटस पडलं महागात! प्रचाराची वेळ संपली तरी देखील सोशल मीडियावर प्रचार सुरुच; 66 उमेदवारांना नोटीस

कोल्हापुरात प्रचाराची वेळ जरी संपली असली तरी देखील काही उमेदवार सोशल मीडियावर अप्रत्यक्षरित्या प्रचार करत आहे. यामुळे, निवडणूक प्रशासनाने 66 उमेदवारांना नोटीस पाठवली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 15, 2026 | 03:43 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • कोल्हापुरात महानगरपालिकेची रणधुमाळी
  • प्रचाराची वेळ संपली तरी देखील सोशल मीडियावर प्रचार सुरु
  • 66 उमेदवारांना पाठवली नोटीस
महाराष्ट्रातातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. कुठे शांतपणे तर कुठे गोंधळाच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. शाहू नगरीत म्हणजेच कोल्हापुरात देखील मतदानप्रक्रिया सुरळीत पार पडत आहे. त्यात 10 वर्षानंतर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होत असल्याने शहरातील काही प्रभागाच्या निवडणूक अत्यंत महत्वाच्या बनत आहे. एकंदरीत सगळ्या नागरिकांचे लक्ष मनपा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहेत. मात्र, अशातच निवडणूक प्रशासनाने 66 उमेदवारांना नोटीस पाठवली आहे. ही नोटीस नेमकी का पाठवली आहे, यामागील कारण जाणून घेऊयात.

TMC Election 2026: टिटवाळ्यात EVM वर उमेदवाराचे भलतेच नाव! मतदारांमध्ये गोंधळ, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

सोशल मीडियावर अप्रत्यक्ष प्रचार सुरूच!

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज शहरातील ८१ जागांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. एकूण २० प्रभागांमधून साडेतीनशेहून अधिक उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून, मतदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर १३ जानेवारीपासून जाहीर प्रचारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली होती. यामध्ये प्रत्यक्ष प्रचारासह सोशल मीडियावरील प्रचारालाही स्पष्ट मनाई करण्यात आली होती.

मात्र, या बंदीला न जुमानता काही उमेदवारांनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रचार सुरूच ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत सायबर पोलीस आणि निवडणूक प्रशासनाने संबंधित उमेदवारांवर कारवाईचा इशारा दिला असून, नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

Maharashtra Politics: “टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्रॉंगरूममधून…”: उद्धव ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप

कोल्हापुरात आतापर्यंत एकूण किती मतदान झाले?

कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, भाजपा खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. माहितीनुसार, कोल्हापुरात 81 जागांसाठी सकाळी 11.30 वाजेपर्यंत 22.45 टक्के मतदान झाले आहे.

Web Title: Kmc elections 2026 campaigning continues on social media even after campaigning period ends notices issued to 66 candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

PMC Municipal Election 2026: लाडकी बहीण योजनेमुळे वारं फिरणार? पुणे महापालिका निवडणूक नव्या वळणावर
1

PMC Municipal Election 2026: लाडकी बहीण योजनेमुळे वारं फिरणार? पुणे महापालिका निवडणूक नव्या वळणावर

मतदार यादीत घोळ, भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले; रोहित पवारांचे गंभीर आरोप
2

मतदार यादीत घोळ, भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले; रोहित पवारांचे गंभीर आरोप

Municipal Elections 2026: राजकीय क्षेत्रातील ‘या’ दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा PHOTO
3

Municipal Elections 2026: राजकीय क्षेत्रातील ‘या’ दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा PHOTO

BMC Election 2026 : नेलपेंट रिमूव्हरने पुसली जातीये मतदानाची शाई; रोहित पवारांनी थेट शेअर केला VIDEO
4

BMC Election 2026 : नेलपेंट रिमूव्हरने पुसली जातीये मतदानाची शाई; रोहित पवारांनी थेट शेअर केला VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.