उद्धव ठाकरेंची आयोगावर टीका (फोटो- सोशल मीडिया)
उद्धव ठाकरेंची फडणवीस आणि भाजपवर टीका
ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर देखील साधला निशाणा
शाई पुसली जात असल्याचा प्रकार आला समोर
BMC Election 2026: आज राज्यात 29 महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. राज्यभरात नागरिक आपला मतदान करण्याचा हक्क बजावत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काही ठिकाणी मशीन बंद पडले असल्याचा, हाताला लावलेली शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत निवडणूक आयोगासह, भाजपवर निशाणा साधला आहे.
मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि ठाकरे बंधू यांच्यात मुख्य लढत होणार आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी आयोगावार टीका केली आहे. इतक्या वर्षांनी आज निवडणुका होत आहेत. मात्र परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा दिसून येत नाही. आता तर शाई पुसली जाण्याचे प्रकार समोर येत आहेत. निवडणूक आयोगाचे आयुक्त नक्की कसला पगार घेतात? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, “संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा. सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक बातम्या समोर येत आहेत. शाई पुसली जात आहे. ही शाई नव्हे तर लोकशाही पुसली जात आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी काही प्रभागांमधील टपाली पेट्या स्ट्रॉंगरूममधून बाहेर काढण्याचे आदेश दिल्याचे समोर येत आहे. हा नक्की काय प्रकार आहे? महायुतीकडे कर्तुत्व नाही. ”
BMC Election 2026 : “मतदानासाठी वापरण्यात आलेली शाई पुसली जाते…”, निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं…
निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं…
राज्यात मनपाच्या सार्वत्रिक निवडणूक मतदार केंद्रावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि राज्यातील इतरत्र मतदार केंद्रावर शाई पुसली गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत असून या भोंगळ कारभारामुळे निवडणूक आयोगावर मतदारांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत. बोगस शाईप्रकरणावर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होत असातानाच निवडणूक आयोगाने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर शाई पुसण्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. याबाबत चौकशी करत आहोत. शाई का पुसली जात आहे याची तपासणी करण्यात येईल. मतदeरांनी असं देखील म्हटलं की, यावेळी मतदान करताना मार्कर पेन वापरला गेलाय. मात्र मतदान प्रक्रियेत निवडणूक आयोगाकडून याआधी देखील मार्करपेन वापरण्यात आलेला आहे. मतदारांच्या बोटावर शाई लावताना ती गडद रंगाने लावण्यात यावी, अशा आम्ही सुचना दिल्या आहेत असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.






